Ratnagiri Rain : गेल्या आठ दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हुलकावणी, शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पावसानं चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्याचे डोळे पावसाकडे लागले आहेत.
Ratnagiri Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी जोराचा पाऊस कोसळताना दिसत आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारल्यानंतर जुलै महिन्यात मात्र, सर्वत्र चांगल्या पावसाची नोंद झाली. मात्र, सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पावसानं चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्याचे डोळे पावसाकडे लागले आहेत. भाताच्या (Rice) शेतीसाठी कोकणातील शेतकऱ्यांना आणकी पावसाची गरज आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यात गेल्या आठ दिवसात शून्य टक्के पावसाची नोंद झाली आहे. आठ दिवसापासून जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकरी पावसाची वाट भगत आहेत. कारण पिक चांगलं येण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची गरज आहे. आजपासून श्रावण सारख्या नयनरम्य महिन्याला सुरुवात झाली आहे. शिवाय सृष्टीही हिरव्या शालूत खुलून दिसत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोसळणाऱ्या पावसाच्या सरी गेल्या आठवड्यापासून कमी बरसू लागल्या आहेत. पर्जन्यमानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यातून शून्य टक्के पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै महिन्यात राज्यांच्या बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कलीत झालं होते. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रत्यांचही मोठं नुकसान झालं आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. सध्या विविध ठिकाणी पंचनामे सुरु असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे. दरम्यान, काही ठिकाणी अद्यापही शेतातील पिकं चांगली येण्यासाठी पावसाची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या: