प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज (दि. १५) जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारकडे केली होती.
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज (दि. १५) जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणी नंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली.
धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे मानले आभार
सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्याप ही अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित आहे त्यामुळे पीक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला. तसेच असून मंत्री धनंजय मुंडे स्वतः याबाबत पाठपुरावा करत होते. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पिक विमा भरण्याचे मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.
धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये काय काय म्हटलं?
केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत आपल्या पिकाचा विमा भरण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. उर्वरित पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी आपला पीकविमा 31 जुलै पर्यंत भरून घ्यावा.. केंद्रीय कृषिमंत्री आदरणीय
साहेब यांचे मनस्वी आभार!
केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत आपल्या पिकाचा विमा भरण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. उर्वरित पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी आपला पीकविमा 31 जुलै पर्यंत भरून घ्यावा..
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 15, 2024
केंद्रीय कृषिमंत्री… pic.twitter.com/dtxfkqumiw
इतर महत्वाच्या बातम्या