एक्स्प्लोर

Raju Shetti : चायनीज प्लास्टिक फुलांच्या वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घाला, राजू शेट्टी यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी 

Raju Shetti : चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.

Raju Shetti : चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे. या फुलांमुळे देशातील फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे राजू शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे.  

याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी तातडीने पर्यावरण खात्याचे अतिरिक्त सचिव नरेश पाल गंगवार व सहसचिव सत्येंद्रकुमार यांना याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सुतोवाच केले आहेत. 

दरम्यान, राजू शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोना लॅाकडाऊन संकटानंतर देशाच्या बाजारपेठेत स्थिर स्थावर होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या फुल उत्पादकांचा चीनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीने व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे. त्यामुळे चायनीज प्लास्टिक फुले वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घालण्यात यावी.  

गेल्या दोन वर्षात कोरोना लॅाकडाऊन आणि चायनीज प्लास्टिक फुलांच्या आयातीने देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू ,अॅस्टर, शेवंती, गॅलार्डिया इत्यादी सुट्या फुलांना व लॅडओलस, गुलाब, जरबेरा, कानेंशन, ऑर्केड्स, अॅन्थुरियम या दांड्याच्या फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र ही सर्व फुले चीनमधून प्लॅस्टिक स्वरूपात आयात झालेली आहेत व त्याचाच वापर केला जात आहे. याचा सर्वाधिक फटका देशातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसून बाजारात फुलांचे दर गडगडले आहेत. 

फुलशेती करण्यासाठी फुल उत्पादक शेतकऱ्यांना सेड नेट ऊभे करण्यासाठी एकरी 10 ते 15 लाख, तर ग्रीन हाऊस ऊभे करण्यासाठी एकरी 70 ते 75 लाख रूपये इतका खर्च येतो. सरकारकडून मिळणारे अनुदानही तुटपुंजे असून या कर्जाचा सर्व बोजा शेतकऱ्यांवर पडत असल्याकडे राजू शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ajit Pawar On Dharan : धरणाच्या वाक्यामुळे माझं वाटोळं झालं,पहिल्यांदाच संपूर्ण किस्सा सांगितलाJayant Patil on Shashikant Shinde : शशिकांत शिंदे चारपट मतांनी विजयी होतील- जयंत पाटीलLok Sabha Election 2024 : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींच्या सभाAaditya Thackeray : मिंधे सरकारच्या काळात एकही उद्योग राज्यात आला नाही - आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Mumbai Crime : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री, एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
Embed widget