एक्स्प्लोर

Parbhani: हृदयद्रावक घटना! कर्जाला कंटाळून पत्नीची हत्या करून शेतकऱ्याची आत्महत्या

Parbhani: याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.

Parbhani: कर्ज व नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्यानं पत्नीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना परभणीच्या पालम तालुक्यातील पूयणी येथे रविवारी रात्री (9 जानेवारी) घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.

रंगनाथ हरिभाऊ शिंदे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. रंगनाथ हे आपल्या पत्नीसह पालम तालुक्यातील पूयणी येथे वास्तव्यास होते. मात्र, रंगनाथ यांनी काल रात्री कर्जाला कंटाळून पत्नी झोपेत असताना तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री 10 आणि 12 वाजताच्या सुमारास घडली. 

रंगनाथ शिंदे यांना चार ते पाच एकर जमीन असून दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या स्वतःच्या शेतात बैल जोडीचे औत केले होते. त्याच बरोबर दूध व्यवसाय म्हणून एक म्हैस घेतली होती. परंतु  यावर्षी निसर्गाच्या अवकृपेनं सोयाबीनचं पीक, तूर आणि मूग गेल्यानं रंगनाथ नैराश्यात गेले. आता आपण हे कर्ज कसे फेडावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. यासंदर्भात ते इतरांशी वारंवार चर्चा करत होते.

त्यांना नेमके किती कर्ज होते हे मात्र कळू शकले नाही. मात्र कर्जाची परत फेड होत नसल्याने नाईलाजास्तव त्यांनी पत्नीचा जीव घेऊन स्वतःचे जीवन संपवले.या घटनेची फिर्याद दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पालम पोलिस स्टेशन येथे मयताचे मोठे भाऊ संतोष हरीभाऊ शिंदे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी आत्महत्येची नोंद केली आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
Embed widget