एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Palghar : पालघरमध्ये पावसाची विश्रांती, चांगला पाऊस झाल्यानं शेती कामांना वेग  

Palghar Agriculture News : आज पालघर जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून बळीराजा पुन्हा कामाला लागला आहे. 

Palghar Agriculture News : सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, पालघर (Palghar) जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या सात दिवसापासून सातत्याने पाऊस सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या (Sowing) पूर्णपणे खोळंबल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली होती. मात्र, आज पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून बळीराजा पुन्हा कामाला लागला आहे. 

 जव्हार, मोखाडा या तालुक्यामध्ये शेती कामांना वेग

पालघर जिल्ह्यात 75 हजार हेक्टर क्षेत्रावरवर भात शेतीची लागवड केली जाते. तर इतर क्षेत्रात तूर, वरी, नागली, बाजरी अशी पिकं घेतली जातात. या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकरी जमिनींची मशागत करताना दिसत आहेत. विशेषतः ही पीक पालघर जिल्ह्यातील पूर्वपट्टीतील घाटमाथ्यावर घेतली जातात. यामध्ये जव्हार, मोखाडा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पावसानं विश्रांती घेतल्यामुळं आता शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उतरुन नांगरणी करुन विविध पिकांची पेरणी करायला सुरुवात केली आहे. 

पालघर जिल्ह्यातील नदी नाले दुथडी

मुसळधार पावसामुळं पालघर जिल्ह्यातील नदी नाले धबधबे प्रभावित झाले असून मोठा पूर आलेला पाहायला मिळतोय. तर धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या प्रमुख शहरांसह वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत 1161 मिमी पावसाची नोंद झाली असून पालघर तालुक्यात सर्वाधिक 256 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 

राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी

मुंबईसह (Mumbai) राज्यातील काही भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना होऊन गेला तरी पाऊस नसल्यानं शेतकरी (Farmers) चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे तसेच कोकणातील जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं चित्र दिसत आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम पुणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नारिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 

कोकणातही जोरदार

कोकणात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेत चिखलमय झाल्याने नांगरणीत शेतकरी गुंतलेला पाहयला मिळतोय. सध्या कोकणातील गावागावांत पावसाने उगवलेल्या हिरव्यागार गवतामधून बळीराजा शेत नांगरताना निसर्गाचं देखण रुप पाहायला मिळतय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राजयगड जिल्ह्यामध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. खार बंदीस्ताच्या बंधाऱ्याला तडे गेल्यानं परिसरातील 48 गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं गावकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान, आजही हवामान विभागानं रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP MajhaZero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget