एक्स्प्लोर

Onion Export: सलग तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास परवाना रद्द; सहकार विभागाचा थेट इशारा

Onion Export: गाळाधारक व्यापाऱ्यांनी तीन दिवसांच्या आत आपले व्यवहार पूर्ववत करण्याचे सहकार विभागाचे आवाहन आहे.

नाशिक :  कांदा निर्यात बंदीनंतर (Onion Export Ban)  सहकार विभाग अॅक्शन मोडवर आले आहे. सलग तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास परवाने रद्द केले जाणार असा इशारा सहकार विभागाने दिला आहे.  लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यासाठी बाजार समित्यांना सहकार विभागाने  पत्र  लिहिले आहे.  केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याच्या विरोधात जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव  ठप्प झाले आहेत.  शुक्रवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाल्यानंतर लिलाव बंद करण्याची हाक कांदा व्यापाऱ्यांनी दिली होती, त्याला जिल्ह्यातील बाजार समितीत प्रतिसाद मिळत आहे.

गाळाधारक व्यापाऱ्यांनी तीन दिवसांच्या आत आपले व्यवहार पूर्ववत करण्याचे सहकार विभागाचे आवाहन आहे.  बाजार समित्यांमधील साप्ताहिक सुट्टीचा दिवस (रविवार) वगळला जाणार आहे. सहकार विभागाने सर्व जिल्ह्यातील परिस्थिती जाणून  घेतला आहे.  जिल्ह्यात जवळपास 60 ते 70 टक्के व्यवहार बंद असल्याचे निरीक्षण  सहकार विभागाने नोंदवले आहेत.  केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकरी आणि व्यापारी दोघांमध्ये उद्रेक बघायला मिळला. मात्र यावेळी नाशिक जिल्हा नाही तर संपूर्ण देशभरात बंद पुकारला जाईल असा विश्वास व्यापारी व्यक्त करत आहेत, त्यामुळे केंद्र सरकार काय मध्यममार्ग काढणार याकडं लक्ष लागलय.

' निर्यातबंदी ' ची कुऱ्हाड शेतकऱ्यावर चालवल्याने शेतकरी हवालदील

 मागील आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती उत्पादनाचे मोठे नुकसान होवून शेतकरी चांगलाच झोडपलेला असतांना त्यातून शेतकरी कसाबसा उभा राहू पाहत होता मात्र पुन्हा एकदा केंद्र सरकारने ' निर्यातबंदी ' ची कुऱ्हाड शेतकऱ्यावर चालवल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.. आशिया खंडातील जागतिक बाजारपेठ म्हणून उल्लेख असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव ही देखील नाशिक जिल्ह्यातच आहे.जवळपास 80 टक्के कांद्याला अवकाळी व गारपिटीची तडाखा बसला. फक्त 20 टक्केच कांदा वाचला. लाल कांद्याला चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल समाधानकारक भाव मिळत असल्याने उरलेल्या कांदा विक्रीतून उत्पादन खर्च तरी निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने आता उरलेला कांदाही कवडीमोल भावाने विकावा लागणार असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा जर लवकर विक्री नाही झाला तर तो शेतातच सोडून द्यावा लागणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

हे ही वाचा :

Onion Export Ban : कांदा निर्यातीबद्दल दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; कृषिमंत्री धनंजय मुंडेंची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Embed widget