(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : सध्या पाणी दिसले की लाव कांडी असं सुरु, पण आपल्याला ब्राझीलसारखा विचार करावा लागेल : शरद पवार
पाणी दिसल, जमीन दिसली की आपण ऊस लावतो. पण आता आपल्याला नवीन विचार करावा लागेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
Sharad Pawar : सध्या राज्यात उसाची शेती इतकी वाढली आहे की मला याची काळजी वाटते. जवळपास मे अखेरपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील असे दिसत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. पाणी दिसलं की आपण ऊस लावतो, पण आता नवीन विचार करावा लागेल. ब्राझील, अमेरिकासारख्या देशात इथेनॉलचा वापर जास्त करतात आपल्याला देखील तसा विचार करावा लागेल असेही पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार हे आज दिवसभर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. दरम्यान त्यांच्या आजच्या दौऱ्याची सुरुवात ही शिराळा येथील कार्यक्रमाने झाली. शरद पवार यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येत माजी मंत्री शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप करत त्यांनी पुन्हा हातावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आहे. यावेळी पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी वाढत्या उसाच्या शेतीबद्दल खाळजी व्यक्त केली. मे अखेरपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील असे दिसत असल्याचे पवार म्हणाले. पाणी दिसलं की आपण ऊस लावतो, पण आता नवीन विचार करावा लागेल. ब्राझील, अमेरिकासारख्या देशात इथेनॉलचा वापर जास्त करतात आपल्याला देखील तसा विचार करावा लागेल असेही पवार यावेळी म्हणाले.
केवळ उसापासून साखर असा विचार करुन आता चालणार नाही. इथेनॉलकडे वळलं पाहिजे असे शरद पवार यावेळी म्हणाले. साखरेच्या कर्जाचे व्याज कारखान्यावर येतं, त्यामुळं वेगळं काही करता येत का हे पाहावं लागेल असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
या ठिकाणी एकेकाळी पाण्यासाटी संघर्ष केला जात होता. पाण्याची कमतरता होती. पण गेल्या काही वर्षात सर्वांच्या प्रयत्नाने प्रश्नांची सोडवणूक झाली आहे. येणाऱ्या काळात राहिले प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असेही पवार म्हणाले. उसाची शेती इतकी वाढायला लागली की गाळप कसे करायचे हा प्रश्न आहे. बाळासाहेब पाटील सहकारमंत्री आहेत, त्यांना मी सतत विचारत असतो की, कारखाने आणखी किती दिवस चालणार, सगळा ऊस जाणार की नाही., यांसदर्भात त्यांनी मला सगळी माहिती दिल्याचे पवार यांनी सांगितले. कारखाने मे अखेरपर्यंत चालणार असल्याचे सांगितले. पाणी दिसल, वावर दिसल की तुम्ही कांडी लावल्याशिवाय राहत नाही असेही पवार म्हणाले. तुम्ही दुसऱ्या पिकाकडे जात नाही. खात्रीशिर पैसा देणारे पीक म्हणून उसाकडे बघतो. पण आता साखर एके साखर करुन चालणार नाही. दुसरा विचार करावा लागेल असेही पवार यावेळी म्हणाले.