एक्स्प्लोर

Nandurbar News : आल्याच्या शेतीतून शाश्वत उत्पादनाचा मार्ग, नंदूरबारमध्ये पावणे दोन एकरात 16 टन उत्पादन अपेक्षीत, मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं आल्याच्या शेतीतून भरघोस उत्पादन घेतलं आहे. पावणे दोन एकरात आल्याचे 16 टन उत्पादन अपेक्षीत आहे.

Nandurbar Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना (Farmers) विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येतात. मात्र, या संकटांवर मात करुनही काही शेतकरी शेतात नवीन प्रयोग करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर शेतीतूनही चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येऊ शकतं हे नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील एका शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे. राजेंद्र पवार असं शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत आल्याची शेती (Ginger cultivation) केली आहे. या शेतीतून त्यांनी शाश्वत उत्पादन मिळवले आहे. पावणे दोन एकरात त्यांना आल्याचे 15 ते 16 टन उत्पादन अपेक्षीत आहे.

राजेंद्र पवार यांच्याकडे 14 एकर जमीन आहे. यापैकी त्यांची काही जमीन गावाजवळ आहे. गावाजवळ असलेल्या जमिनीत पाळीव प्राणी आणि इतर कारणांनी  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. त्यामुळं त्यांनी या पावणे दोन एकर जमिनीत काही नवीन प्रयोग करण्याचे ठरवले. राजेंद्र पवार यांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन आल्याची  शेती करण्याचे नियोजन केले. यासाठी त्यांनी नाशिकमधून 20 रुपये किलोने दरानं आल्याचे बेणे खरेदी केले. या आल्याच्या शेतीमधून त्यांनी भरघोस उत्पादन घेतलं आहे. पावणे दोन एकरात त्यांनी आल्याचे 16 टन उत्पादन अपेक्षीत हे. या आल्याला मध्य प्रदेशमधील व्यापारी जागेवरच किलोला चाळीस रुपयांचा दर देत आहेत.

10 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत

आतापर्यंत पावणे दोन एकर आल्याच्या शेतीत दोन लाख  रुपयांचा खर्च झाला आहे. यामधून दहा लाख रुपयार्यंतच्या उत्पादनाचा अंदाज असल्याची माहिती शेतकरी राजेंद्र पवार यांनी दिली. खर्च वजा जाता आठ लाख रुपये निवव्व नफा राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्याला आल्याची विक्री

माझ्याकडे 14 एकर शेती असून यामध्ये केळी, पपई, टरबूज, हरभरा आहे. यावर्षी मी आल्याची लागवड केल्याची माहिती शेतकरी राजेंद्र पवार यांनी दिली. आल्याच्या लावडीतून मला चांगला फायदा होत आहे. पावणे दोन एकरमधून मला 15 ते 16 टन माल निघण्याची अपेक्षा आहे. या मालाची मी मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्याला 40 रुपये किलो दरानं विक्री करणार असल्याचे पवार यांनी सांगितेल.

महत्त्वाच्या बातम्या:

Cleaning Tips : साफसफाईसाठी आल्याचा 'असा' करा वापर; वाचा संपूर्ण माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 PM: 30 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti Seat Sharing Formula : जागावाटप, उमेदवारांबाबत नेमकं काय ठरलं? Special ReportPM Modi Solapur : मोदींचा कार्यक्रम, सत्ताधारी आमदारांची दांडी, सांगितली 'ही' कारणे Special ReportAkshay Shinde Funeral : नराधमाचं दफन, 'प्रश्न' जिवंतच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget