एक्स्प्लोर

Minimum support price : हमीभावाच्या कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा मैदानात, दिल्लीत होणार  MSP गारंटी कानून' अधिवेशन 

हमीभावाच्या मुद्यावरुन शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण, 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान, दिल्लीत तीन दिवसाचे  देशव्यापी  'एमएसपी गॉरंटी कानून'  अधिवेशन भरणार आहे.

Farmers Convention : देशातील विविध शेतकरी संघटना हमीभावाबाबत कायदा करावी अशी मागणी करत आहेत. हमीभावाच्या मुद्यावरुन शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण, 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान, दिल्लीत तीन दिवसाचे  देशव्यापी  'एमएसपी गारंटी कानून'  अधिवेशन भरणार आहे. हे अधिवेशन दिल्ली येथील पंजाब खोड या गावात भरणार असल्याची माहिती या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली आहे. MSP च्या कायद्यासाठी शेतकरी आग्रही आहेत.

महाराष्ट्रातील शेतकरी देखील मोठ्या संख्येनं जाणार, शेट्टींची माहिती

हमीभावाच्या मुद्द्यावरुन विविध शेतकरी संघटना पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. दिल्लीत तीन दिवसाचे  देशव्यापी  'एमएसपी गारंटी कानून' अधिवेशन भरण्यात येणार आहे. हे अधिवेशन 6 ते 8 ऑक्टोबरला असणार आहे. या अधिवेशनासाठी देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे नेते येणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी देखील मोठ्या संख्येनं या अधिवेशनास जाणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी दिल्लीमधील अधिवेशनात सामील होणे गरजेचे असल्याचे शेट्टींनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी रेल्वेचं तिकीट बुक करावं

ज्या शेतकऱ्यांना रेल्वेने यायचे आहे, त्या शेतकऱ्यांनी चार ऑक्टोबर रोजीचे रेल्वेचे तिकीट काढायाचे आहे. पुणे, मिरज, कोल्हापूर, परभणी, नांदेड, जालना, नाशिक आदी स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांचे बुकींग प्रत्येकाने स्वतः करुन घ्यावे. येत्या दोन दिवसात बुकींग केल्यास कन्फर्म तिकीट मिळेल. तरी ज्या शेतकऱ्यांना दिल्लीमधील अधिवेशानासाठी यायचे आहे. त्यांनी आगाऊ तिकीट बुकींग करुन घ्यावं. तसेच विमान तिकीट काढायचे असेल तर मध्यवर्ती कार्यालयास संपर्क साधावा असं आवाहन देखील राजू शेट्टी यांनी केलं आहे. . 

MSP च्या कायद्यासाठी शेतकरी संघठना आग्रही 

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांनी वर्षभर दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केलं होतं. या शेतकर्‍यांच्या आंदोलनापुढे नमतं घेत केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे मागे घेतले होते. ऊसाला केंद्र सरकारने निश्चित केलेली एफआरपी शेतकर्‍यांना देणं कायदेशीररित्या बंधनकारक केलं आहे. तशाच पद्धतीने शेतकर्‍याने उत्पादित केलेल्या प्रत्येक कृषिमालाला सरकारने जाहीर केलेला हमीभाव कायदेशीररित्या मिळावा. तसेच यासाठी हमीभावाचा एक कायदा असावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. मात्र, अद्याप ही मागणी केंद्र सरकारनं मंजूर केली नाही. MSP च्या कायद्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना पुन्हा आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget