(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monsoon Alert : यंदा मान्सून वेळेआधी; दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज
Monsoon Weather : यंदा मान्सून वेळेआधीच येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा पाऊस 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
Monsoon Weather Update : यंदा मान्सून वेळेआधीच येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD - Indian Meteorological Department) वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस 22 मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा पाऊस 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यानंतर 20 ते 26 मेपर्यंत पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पाऊस सुरु होण्याची तारीख हवामान विभागाकडून 15 रोजी जाहीर होणार करण्यात येईल. अंदमानच्या समुद्रावर 13 ते 19 मे दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी अंदबारमध्ये मान्सून 22 मेपर्यंत दाखल होतो. मात्र यंदा मान्सून वेळे आधी दाखल होणार आहे.
Rainfall forecast for coming 4 weeks by IMD;
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 12, 2022
Week 1 Rainfall over Andaman Sea could be good.
Week 2 and 3 indicates enhanced rainfall activity over Arabian sea.
In week 2 & ahead rainfall over the south peninsula and adjoining Southeast Arabian Sea will be above normal . pic.twitter.com/wZqLNkz0qB
हवामान तज्ज्ञांचा अंदाज
पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, 'आगामी पहिल्या आठवड्यात अंदमानानवर मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर पाऊस होईल आणि त्यानंतर पुढील आठवड्यात भारतात मान्सून दाखल होईल.'
'असनी' चक्रीवादळाने बदलला मार्ग, 'या' भागांसाठी 'रेड अलर्ट'
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला आहे, बंगालच्या उपसागरावर 'असनी' चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे, हवामान खात्यानुसार या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. सध्या वादळामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :