(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milk Production : राजस्थान सरकारचा दूध उत्पादकांना दिलासा, प्रति लिटर दुधाला पाच रुपयांचे अनुदान
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राजस्थान सरकार एक चांगली योजना राबवत आहे. 'मुख्यमंत्री दूध उत्पादक संबल योजना' (Mukhyamantri Dugdh Sambal Yojna) असं या योजनेचं नाव आहे.
Milk Production : सध्या देशातील काही राज्यात लम्पी स्कीन आजारानं (Lumpy Skin Disease) थैमान घातलं आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. सगळ्यात जास्त लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव हा राजस्थानमध्ये (Rajasthan) झाला आहे. राजस्थानमध्ये जनावरांची संख्या खूप मोठी आहे. या राज्यातून मोठ्या प्रमाणावर दुधाची निर्यात केली जाते. या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राजस्थान सरकार एक चांगली योजना राबवत आहे. 'मुख्यमंत्री दूध उत्पादक संबल योजना' (Mukhyamantri Dugdh Sambal Yojna) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून दूध उत्पादकांना प्रतिलिटर दुधाला पाच रुपयांचे अनुदान मिळत आहे.
दूध उत्पादकांसाठी राजस्थान महत्वाची मुख्यमंत्री दूध उत्पादक संबल योजना आणली आहे. या योजनेचा मोटा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. दूध उत्पादकांना प्रतिलिटर दुधाला पाच रुपयांचे अनुदान मिळत आहे. जर एखाद्या पशुपालकानं दररोज 100 लिटर दूध विकले तर त्याच्या खात्यावर 500 रुपये सरकारकडून जमा होतील.
अनुदान म्हणजे नेमकं काय?
राजस्थान सरकारने डेअरी उद्योगाला बळकटी देण्यासाठी ही योजना आणली आहे. दूध उत्पानात वाढ व्हावी, शेतकऱ्यांना फायदा मिळावा यासाठी, राजस्थान सरकार पावले उचलत आहेत. मुख्यमंत्री दूध उत्पादक संबल योजनेंतर्गत याआधी प्रतिलिटर दुधाला दोन रुपयांचे अनुदान मिळत होते, मात्र सरकारकडे अनुदान वाढवण्याची मागणी दूध विक्रेते करत आहेत. सरकारने आता ते 5 रुपये प्रतिलिटर केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळं दूध विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भाजप सरकारच्या काळात ही योजना केली होती बंद, यंदा 550 कोटी रुपयांची तरतूद
ही योजना 2013 मध्ये सुरु करण्यात आली होती. परंतू नंतर राजस्थानमध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यावर फेब्रुवारी 2019 मध्ये ती पुन्हा सुरु करण्यात आली. सुरुवातीला 80 कोटी रुपयांचे तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली होती. आता अनुदानात वाढ झाल्यामुळं राज्य सरकारने यासाठी 550 कोटी रुपयांचा स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर केला आहे. 1 एप्रिलपासून वाढीव रक्कम गोरक्षकांना दिली जाणार आहे.
13 हजारांहून अधिक दूध उत्पादकांना योजनेचा लाभ
या योजनेचा लाभ घेणाऱ्या दूध उत्पादकांची संख्या कायम आहे. वाढत्या आकडेवारीमुळे सरकार खूश आहे. प्रत्येक दूध उत्पादकाला योजनेचा लाभ मिळावा, असा शासनाचा प्रयत्न आहे. राजस्थान सरकारच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये 12 हजार 226 दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. हा आकडा वाढतच गेला आणि 2022 मध्ये हा आकडा 13 हजार 889 पर्यंत वाढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: