![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ajit Pawar : अजित पवारांना येऊ देऊ नका, अन्यथा कारखान्यात जाऊ देणार नाही, बारामतीत मराठा मोर्चा आक्रमक
मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावरुन दिवसेंदिवस राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा संघटना आक्रमक होताना दिसत आहेत.
![Ajit Pawar : अजित पवारांना येऊ देऊ नका, अन्यथा कारखान्यात जाऊ देणार नाही, बारामतीत मराठा मोर्चा आक्रमक Maratha Kranti Morcha warns Deputy Chief Minister Ajit Pawar not to attend Malegaon Cooperative Sugar Factory event in Baramati Ajit Pawar : अजित पवारांना येऊ देऊ नका, अन्यथा कारखान्यात जाऊ देणार नाही, बारामतीत मराठा मोर्चा आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/16/b35a7a4e02ba60bfd95cbfc9d2efb77d1692169954997614_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ajit Pawar : मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावरुन दिवसेंदिवस राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. अनेक गावांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. आरक्षण दिल्याशिवाय गावात पाऊल ठेऊ नका असा इशारा आंदोलकांनी दिलाय. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलाय. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये आशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि साखर कारखान्याला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे.
अजित पवारांनी कारखान्यावर जाऊ देणार नाही
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येणार आहेत. मात्र, अजित पवारांच्या या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलाय. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये आशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि कारखान्याला दिले आहे. जर अजित पवार कार्यक्रमस्थळी आले तर अजित पवारांना कारखान्यात जावू दिले जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. बारामती तालुक्यात कोणत्याच राजकीय पक्षाच्या लोकांना बारामती फिरु देणार नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे.
दरम्यान, येत्या 28 ऑक्टोबरला अजित पवारांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मोळी पूजन होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अजित पवारांना येऊ देऊ नका, अन्यथा कारखान्यात जाऊ देणार नाही अशा इशारा बारामतीत मराठा क्रांती मोर्चानं दिलाय.
40 दिवसानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन सुरु
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारला दिलेला वेळ संपल्याने जरांगे यांनी उपोषणाची भूमिका ठाम ठेवली आहे. आजपासून मी उपोषणाला बसतोय. सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करतंय. सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेट संपला, 41 दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
अन्न-पाणी घेणार नाही, औषधं घेणार नाही. गावात कुणी आलं तर त्यांना शांततेत माघारी पाठवा, असं आवाहन जरांगे यांनी गावकऱ्यांना केलं आहे. उग्र आंदोलन करू नका, आंदोलन शांततेनं करा, आत्महत्या करू नका, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करतंय. सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला, 41 दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Maratha Reservation : मनोज जरांगेच्या लढ्याचा दुसरा अध्याय! आमरण उपोषणाला सुरुवात; आंदोलन उग्र करु नका, मराठ्यांना आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)