एक्स्प्लोर

Maharashtra Weather Report : कोकण, विदर्भाला अवकाळी पावसानं झोडपलं; भात शेतीसह फळबागांचं नुकसान

Maharashtra Unseasonal Rain : कोकणात आज पुन्हा काही भागात अवकाळी पाउस पडला आहे. याशिवाय विदर्भालाही अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलं आहे, यामुळे भात शेतीसह फळबागांचं नुकसान झालं आहे.

मुंबई : कोकणात (Kokan) पुन्हा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. यामुळे आंबा (Mango) बागायतदार पुन्हा चिंतेत आहेत. रायगड, रत्नागिरी सीमेवरील भागात पाऊसाच्या सरी कोसळल्या आहेत. कोकणात आज पुन्हा काही भागात अवकाळी पाउस पडला, त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. सकाळपासून रायगड, रत्नागिरी सीमेवरील भागात ढगाळ वातावरण पसरल्याने दमट हवा पाहायला मिळाली. आकाशात काळे ढग पसरले होते, यावरून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. अखेर पावसाने आज सकाळी 8 वाजेपासून हजेरी लावली. 

हिंगोलीत जोरदार अवकाळी पाऊस

हिंगोली जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्रीपासून जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी वाळू घातलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणात या पावसाने नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी हळदीची काढणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हळद शिजवून शेतामध्ये वाळू घातली होती. परंतु रात्री झालेल्या पावसामुळे ही हळद पूर्णपणे भिजवून गेली आहे. त्यामुळे या हळदीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हळद भिजल्यामुळे या हळदीला आता बाजारात सुद्धा भाव मिळणार नाही, त्यामुळे निम्म्या भावनांची हळद बाजारात विकावी लागणार आहे, असं शेतकरी सांगत आहेत. या अवकाळी पावसाने हळद उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे.  

सातारा, परभणीतही पावसाच्या सरी

सातारा शहरात पाऊस झाला आहे. कराड परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. सोसाट्याचा वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत. परभणीतही मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी तुफान पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. परभणीत आज सायंकाळपासून पुन्हा तुफान पाऊस बरसतोय. परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. विजांच्या कडकडाटासह सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्याने उन्हाळा सुरु आहे की, पावसाळा असा प्रश्न परभणीकरांना पडला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतीसह फळबागांचं नुकसान

वाशिममध्ये मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अर्ध्या तासाच्या वादळी वाऱ्याने होत्याच नव्हत झालं. वाशिमच्या कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मेहा येथील चार एक्कर क्षेत्रातील पपई पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे.   परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मेहा येथील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. मोठ्या कष्टाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या पपई बागेचे अर्ध्या तासाच्या अवकाळी वादळी पावसामुळे होत्याच नव्हत झालं. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

अवकाळी पावसामुळे भात पिकांचं नुकसान

भंडाऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सोमवारी रात्री सुरु झालेला अवकाळी पाऊस मधेमधे रिपरिप सुरुच आहे. यामुळे कापणीला आलेल्या भातपिकांच्या लोंबी गळून पडल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्यानं शेतकरी चिंतातूर झाला आहे. दरम्यान, जोरदार पाऊस सुरू असताना अनेक भागातील वीजपुरवठा बऱ्याच काळासाठी खंडित झाला होता. या पावसाचा अन्य पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनही हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत.

झाडं कोसळल्यानं नुकसान, दुचाकीस्वार जखमी

वादळी वारा आणि पावसामुळे कोल्हापूर शहरात दोन ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. झाड कोसळल्याने दोन चार चाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान गाडी रस्त्याच्या कडेला लावलेली असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. परिख फुलाजवळ झाड कोसळल्याची घटना घडली आहे. 
कोल्हापूर शहर वाहतूक शाखेजवळ देखील आणखी एक झाड कोसळलं. दुचाकीवर झाड कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

JP Nadda on RSS : जे.पी. नड्डा यांचं आरआरएसबाबत मोठं वक्तव्य! दरेकर काय म्हणाले?Shantigiri Maharaj Statment : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा, शांतिगिरी महाराजांचा दावाJ P Nadda On Rss : आता भाजप सक्षम, जेपी नड्डा यांचं RSS वर मोठं वक्तव्य ABP MajhaABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Horror Movies : 'हे' हॉरर चित्रपट अन् वेबसीरिज उडवतील तुमची झोप... अजिबात एकटे पाहू नका; अंगावर येतील शहारे
'हे' हॉरर चित्रपट अन् वेबसीरिज उडवतील तुमची झोप... अजिबात एकटे पाहू नका; अंगावर येतील शहारे
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Embed widget