Onion Price : कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत, शेतकऱ्यांकडून कांद्याचा स्टॉक
कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

Onion Price : सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. आधीच अवकाळी पाऊस,अतिवृष्टी यामुळं पिकांना फटका बसला आहे. कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean), कांदा (Onion) या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या उरल्या सुरल्या पिकांनांही योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात कांद्याचे दर झपाट्यानं घसरत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी कांद्याचा स्टॉक करायला सुरुवात केली आहे.
10 ते 15 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिलं जातं. राज्यातील बहुतांश लोक त्याच्या लागवडीवर अवलंबून आहेत. शेतकर्यांच्या कांद्याला साधारणत: 30 ते 40 रुपये प्रतिकिलोचा भाव मिळतो, म्हणजेच एक क्विंटल कांदा 3000 ते 4000 रुपये दरानं विकला जात असतो. मात्र यंदा कांद्याचे दर खूप कमी झाले आहेत. सध्या कांद्याला प्रतिकिलोसाठी 10 ते 15 रुपयांचा दर मिळत आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन
देशात स्रावत जास्त कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते. येथूनच इतर राज्यांना कांद्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यंदा महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले आहेत. कांद्याला रास्त भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज आहेत. कांद्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांशी सौदेबाजी करत आहेत. असे असतानाही कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवणूक
कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक सुरु केली आहे. शेतकरी कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवत आहेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवत आहेत. लवकरात लवकर कांद्याचा तुटवडा बाजारात येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. लोकांनी कांद्याला मागणी केल्यास कांदा चांगल्या भावाने विकायला सुरुवात होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन
नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ (Onion Market) आहे. या जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी कांद्याची लागवड करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून कांद्याच्या भावात सातत्याने कमी अधिक फरकाने घसरण होत असताना शेतकरी मात्र अजूनही कांदा शेतीवर निर्भर आहे. असे असताना रात्रीचा दिवस करून पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Nashik Onion Rate : 'कांद्याला कोंब फुटले, मात्र सरकारला अजूनही जाग नाही', नाशिकच्या शेतकऱ्यांकडून अनोखा निषेध
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
