एक्स्प्लोर
Mahayuti : महायुतीत कमालीची धूसपूस, अनेक ठिकाणी नेत्यांकडून डिवचणी, शिवसेनेकडूनही स्वबळाचे नारे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांमधील, विशेषतः शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. 'अनेक ठिकाणी भाजपा नेत्यांकडून दिवसण्याचे प्रकार सुरू असल्यानं शिवसेनेतही स्वबळाचे नारे जोर धरू लागलेत,' असा सूर शिवसेनेच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकांमधून उमटत आहे. राज्यभरात, विशेषतः ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जागावाटपावरून आणि स्थानिक नेतृत्वाच्या मुद्द्यांवरून दोन्ही पक्षात तणाव वाढला आहे. भाजपकडून युतीधर्म पाळला जात नसल्याचा आणि शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेचे स्थानिक नेते करत आहेत. या वाढत्या संघर्षामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
महाराष्ट्र
शेत-शिवार
Advertisement
Advertisement

















