Soybean Crop: सोयाबीन अग्रीमसाठी आधीच्या 52 नंतर आता आणखी 21 मंडळांचा समावेश
Soybean Crop Insurance: सोयाबीन अग्रीमसाठी आधीच्या 52 नंतर आता आणखी 21 मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण 86 पैकी 73 मंडळांमध्ये सोयाबीन अग्रीम पीकविम्यास मान्यता देण्यात आली आहे.
Maharashtra News: सोयाबीन अग्रीमसाठी (Soyabean Advance Crop Insurance) आधीच्या 52 नंतर आता आणखी 21 मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण 86 पैकी 73 मंडळांमध्ये सोयाबीन (Soyabean Crop) अग्रीम पीकविम्यास (Advanced Age Protection Crop Insurance) मान्यता तर उर्वरित 13 मंडळाच्या बाबतीत अहवाल पूर्ण झाल्यानंतर सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. बीड (Beed News Updates) जिल्हात अग्रीम पीकविमा देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या कार्यवाहीस आता वेग आला असून सोयाबीन पिकाच्या आधी मंजूर केलेल्या 52 मंडळांसह अग्रीम पीक विमा देण्यासाठी आणखी 21 मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
एकूण 86 मंडळांपैकी 52 मंडळांमध्ये सर्वेक्षणाचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर अग्रीम पीकविमा मंजूर करण्याची अधिसूचना मागील आठवड्यात काढण्यात आली होती. त्यानंतर चार तारखेपर्यंत पूर्ण झालेल्या सर्वेक्षणाचे अहवाल तपासून जिल्हा प्रशासनाने आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आणखी 21 मंडळांमध्ये सोयाबीन या पिकाच्या अग्रीम पीक विम्यास मंजुरी दिली आहे.
आता 86 पैकी 73 मंडळांमध्ये सोयाबीन या पिकास अग्रीम पिक विमा मिळण्याचे निश्चित झाले असून उर्वरित 13 मंडळाचे सर्वेक्षण अजूनही सुरू आहे. हे सर्वेक्षण आणि कृषी विद्यापीठातील हवामान तज्ज्ञ आणि कृषी विद्यावेत्ता यांना 13 मंडळांचा अहवाल आणि उपग्रहानुसारची माहीची (Satellite Data) अहवाल रविवारपर्यंत सादर करण्याचा सूचना आहेत, त्यानुसार सदर अहवाल रविवारपर्यंत येतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील सोमवारी उर्वरित 13 मंडळांचा समावेश करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कापूस आणि तूर या दोन पिकांच्या अग्रीमबाबत देखील सोमवारच्या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली आहे.
'या' 21 मंडळांमधील अग्रीमला मान्यता
धारूर तालुका : धारूर, अंजनडोह, तेलगाव, मोहखेड
गेवराई तालुका : पाचेगाव, पाडळसिंगी, धोंडराई
परळी : परळी
केज : होळ, केज, चिंचोली माळी, हनुमंत पिं., मसाजोग, युसूफ वडगाव, बनसारोळा
पाटोदा : अमळनेर, कुसळंब, पाटोदा, थेरला, दासखेड
वडवणी : चिंचवण
महत्त्वाच्या इतर बातम्या :