
Agriculture News : शेतकऱ्यांना सक्तीने कोणत्याही प्रकारच्या खताची विक्री करू नयेत; अन्यथा कारवाईच इशारा
Hingoli News: शेतकऱ्यांना सक्तीने कोणत्याही प्रकारच्या खताची विक्री करू नयेत, अन्यथा कारवाईचं इशारा हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिला आहे.

Hingoli News: हिंगोली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची खरीप हंगाम सन 2023 पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, खरीप हंगामासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी अनेक महत्वाच्या सूचना यावेळी दिल्या आहेत. तर शेतकऱ्यांना सक्तीने कोणत्याही प्रकारच्या खताची विक्री करू नयेत, अन्यथा कारवाईचं इशारा देखील जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी दिले आहेत.
रासायिनक खतांच्या विशिष्ट ग्रेडची मागणी न करता उपलब्ध रासायनिक खतांमधून गरज भागवावी. उदा. डीएपी ऐवजी युरिया+एसएसपीचा वापर करावा, तसेच शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने युरिया ऐवजी नॅनो युरिया आणि पाण्यात विद्राव्य इतर रासायनिक खताच्या ग्रेडचा वापर करावा. त्यासाठी कृषी विभागाने गाव पातळीवर प्रचार आणि प्रसिद्धी मोहीम राबवावी. तसेच रासायनिक खत उत्पादक कंपनीने घाऊक विक्रेत्यांना, घाऊक विक्रेत्याने किरकोळ विक्रेत्यांना आणि किरकोळ विक्रेत्याने शेतकऱ्यांना सक्तीने कोणत्याही प्रकारच्या खताची विक्री लिंकिंग (Linking) करु नये, असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी दिले.
शेतकऱ्यांना सक्तीने कोणत्याही प्रकारच्या खताची विक्री करू नयेत
शासनाची मान्यता नसलेल्या एचटीबीटी कापूस बियाणांची बियाणे विक्रेत्यांनी खरेदी-विक्री आणि साठवणूक करु नये. शेतकऱ्यांनीही बाहेरच्या राज्यातून छुप्या पद्धतीने एचटीबीटी कापूस बियाणे जिल्ह्यात आणू नये वा त्याची पेरणी करु नये. तसे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, याबाबत पोलीस अधीक्षक यांनाही लेखी पत्राव्दारे कळविण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी त्यांनी दिले.
एमआरपीपेक्षा जादा दर आकारल्यास तक्रार नोंदवावी
तसेच कोणत्याही कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी एमआरपीपेक्षा जादा दर आकारल्यास अथवा इतर कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी मूळ खरेदी बीलासह वेळीच तालुका, जिल्हा तक्रार निवारण कक्षाकडे लेखी स्वरुपात तसेच भ्रमणध्वनीव्दारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
कोणतेही ठवणूक करु नये...
आधार कार्डधारक शेतकऱ्यांना एमआरपी दरानेच पॉस मशिनव्दारे ऑनलाईन रासायनिक खतांची विक्री करावी. तसेच पॉसवरील ऑनलाईन रासायनिक खतांचा आणि गोदामातील रासायनिक खतांचा प्रत्यक्ष साठा नियमित जुळवून अद्यावत ठेवावा. बोगस बियाणे आणि खतांची खरेदी-विक्री आणि साठवणूक करु नये. पुरवठा आणि साठवणूक केलेल्या बियाणांचे Release Order, Statement 1-2 संग्रही ठेवावे. शेतकऱ्यांकडील शेतकरी उत्पादक संघाकडील आणि बियाणे उत्पादक कंपन्यांनी पुरवठा केलेल्या सोयाबीनच्या जास्तीत जास्त बियाणांची पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी करुन घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
