एक्स्प्लोर

Wheat prices : गेल्या सहा आठवड्यात गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ, बिस्किटे, ब्रेड यासारखे पदार्थ महागणार

सध्या गव्हाच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा आठवड्यात गव्हाच्या किंमती 14 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Wheat prices : गहू (Wheat) उत्पादकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सध्या गव्हाच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा आठवड्यात गव्हाच्या किंमती 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं आता मैदा, सुजी, बिस्किटे आणि ब्रेड यासारखे पदार्थ महाग देखील होण्याची शक्यता आहे. मात्र, अशा स्थितीत सध्या लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आपला गव्हाचा साठा विकला आहे.

पावसाळ्यामुळे पुरवठा कमी झाल्याने आणि दळणाची मागणी वाढल्यानं गेल्या सहा आठवड्यात गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळं आता मैदा, सुजी, बिस्किटे आणि ब्रेड यांसारखे पदार्थ महाग होऊ शकतात. लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आपला गव्हाचा साठा विकला आहे, तर बहुराष्ट्रीय कंपन्या आणि मोठे व्यापारी भाव आणखी वाढतील या अपेक्षेने साठा ठेवत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. या वर्षी प्रथमच, भारतीय अन्न महामंडळ अर्थात FCI कडील सरकारी एजन्सी मिलर्ससाठी उपलब्ध नाही.

दरम्यान, सध्या वाढत असलेल्या गव्हाच्या किंमतीच्या संदर्भात रोलर फ्लोअर मिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष नवनीत चितलांगिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या गव्हाच्या किंमती दररोज वाढत आहेत, त्या तुलनेत सध्या गव्हाची उपलब्धता देखील अत्यंत कमी असल्याची माहिती रोलर फ्लोअर मिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष नवनीत चितलांगिया यांनी दिली. उत्तर भारतात वितरित होणाऱ्या गव्हाची किंमत जूनमध्ये 2 हजार 260 ते 2 हजार 270 प्रति क्विंटलच्या निचांकी वरुन आजपर्यंत 2 हजार 300 ते 2 हजार 350 पर्यंत वाढली आहे. त्यामुळं मोठ्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होताना दिसत आहे.

जागातिक गहू उत्पादनात रशिया आणि युक्रेनचा 29 टक्के आणि मक्याच्या उत्पादनात 19 टक्के वाटा आहे. सूर्यफूल तेलाच्या निर्यातीत या दोन्ही देशांचा 80 टक्के वाटा आहे. बार्ली उत्पादनात रशियाचा जगात दुसरा आणि युक्रेनचा चौथा क्रमांक लागतो. एकूणच जागतिक कृषी क्षेत्रात रशिया आणि युक्रेनचं मोठं योगदान आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे धान्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परिणामी, गव्हाच्या किंमती देखील वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
Dattatray Bharne: 265 तालुक्यांनंतर आणखी 19 तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश होणार, कृषिमंत्र्यांची मोठी माहिती, पाहा संपूर्ण यादी
265 तालुक्यांनंतर आणखी 19 तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश होणार, कृषिमंत्र्यांची मोठी माहिती, पाहा संपूर्ण यादी
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
मराठवाड्यात कुठे किती चारा शिल्लक? कुठे 175 दिवसांचा, तर कुठे फक्त 76 दिवसांचा साठा! किती पंचनामे पूर्ण? वाचा सविस्तर
मराठवाड्यात कुठे किती चारा शिल्लक? कुठे 175 दिवसांचा, तर कुठे फक्त 76 दिवसांचा साठा! किती पंचनामे पूर्ण? वाचा सविस्तर

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget