एक्स्प्लोर

Kharif Season 2024 : कृषी विभागाचा कृषी केंद्रांना दम; खतं अन् बियाणे महाग विकाल तर बघाच...

Kharif Season 2024 : कृषी निविष्ठाच्या विक्रीसंदर्भात नियंत्रण ठेवण्याकरिता कृषी विभागाकडून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खते, बियाणांवर कृषी विभागाची करडी नजर असणार आहे.

नाशिक : खरीप हंगाम 2024 (Kharif Season 2024) करिता जिल्ह्यात खते व बियाणे यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असून, शासनाकडून खतांचे एकूण 2.21 लाख मे. टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. तसेच कृषी निविष्ठाच्या विक्रीसंदर्भात नियंत्रण ठेवण्याकरिता 17 भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) कृषी विकास अधिकारी माधुरी गायकवाड (Madhuri Gaikwad) यांनी दिली आहे.

जिल्ह्याकरिता कापूस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमुग, तुर, मुग व उडीद, इ. पिकांच्या मागणीनुसार बियाणे पुरवठा सुरु झाला आहे. जिल्ह्यात खते व बियाणे यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत आहे. खरीप हंगाम 2024 करिता शासनाकडून युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकूण 2.21 लाख मे.टन आवंटन नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे.  दि. 27 मे 2024 अखेर जिल्ह्यात युरिया खत 55 हजार 372 मे.टन, डीएपी 11 हजार 951 मे.टन, एमओपी 2 हजार 361, एसएसपी 13 हजार 958 मे.टन व संयुक्त खते 83 हजार 386 मे. टन असे एकूण 167028 मे.टन खत उपलब्ध आहे. जिल्ह्यातील किरकोळ खत विक्रेत्यांकडे दैनंदिन उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांची माहिती कृषिक या मोबाईल अॅपवर चावडी या सदराखाली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.  

कृषी विभाग किंवा वजन मापे निरीक्षकांकडे तक्रार करण्याचे आवाहन

कृषी निविष्ठा गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी कराव्यात. निविष्ठा खरेदी करताना सील अथवा मोहोरबंद पाकिटे / पिशव्या / बाटल्या असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. शेतकरी (Farmers) बांधवांनी परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच व पक्क्या पावतीवरच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात. तसेच अनुदानित रासायनिक खताची खरेदी ही e-POS मशिनद्वारेच करावी. कमी वजनाच्या निविष्ठा व पाकिटावरच्या छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री करणे तसेच मागणी व्यतिरीक्त इतर निविष्ठांची शेतकऱ्यांना सक्ती करणे हे बेकायदेशीर असून याबाबत कृषि विभागाकडे तसेच वजनेमापे निरीक्षकांकडे तक्रार नोंदवावी. 

17 भरारी पथकांची नियुक्ती

विभाग व जिल्हास्तरावर प्रत्येकी 1 आणि तालुकास्तरावर प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 17 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठाबाबत काही तक्रार असल्यास ७८२१०३२४०८ या भ्रमणध्वनी क्रमांक तसेच जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहनही कृषि विभागामार्फत (Agriculture Department) करण्यात आले आहे.

आणखी वाचा 

खूशखबर! येत्या 5 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, महाराष्ट्रात कधी बरसणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना  मुख्यमंत्रिपदाची ऑफरABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 14 March 2025ABP Majha Headlines : 02 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGunaratna Sadavarte Holi : रंग लावले, पप्पीचा प्रयत्न, सदावर्ते कपलची हटके होळी, FULL VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Embed widget