एक्स्प्लोर

Maharashtra Agriculture News : उच्चशिक्षीत तरुणांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार, 'कृषी सारथी'च्या माध्यमातून बळीराजाला बांधावर सेवा

चार उच्चशिक्षीत तरुणांनी शेतकऱ्यांसाठी 'कृषी सारथी' नावाची संकल्पना राबवली आहे. कृषी सारथीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरपोच सेवा देण्याचं काम सुरु आहे.

Maharashtra Agriculture News : शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. पिकाला मिळणारा कमी दर, नैसर्गिक संकटे, तर कधी सरकारी धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसतो. मागील दोन वर्षात कोरोना काळात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पिकांच्या फवारणीसाठी लागणारी किटनाशक असतील किंवा शेतमालासाठी योग्य प्रकारची बाजारपेठ न मिळणं असेल. या कोरोना काळात शेतकऱ्यांची होरपळ बघून चार उच्चशिक्षीत तरुणांनी (Highly educated youth) शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर काम करायचं ठरवलं. या तरुणांनी 'कृषी सारथी' (krushi sarathi) या नावाची संकल्पना राबवली आहे. या माध्यमातून चार तरुणांनी शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम सुरु केलं आहे. 

Maharashtra Agriculture News : उच्चशिक्षीत तरुणांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार, 'कृषी सारथी'च्या माध्यमातून बळीराजाला बांधावर सेवा

शेतकऱ्यांसाठी तीन महत्त्वाच्या गोष्टीवर काम सुरु

परशराम आखरे, संकेत शेगोकार, नयन बरडे आणि मनोज साबळे या चौघांनी मिळून शेती प्रश्नावर काम करायचे ठरवलं. या चार तरुणांनी कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचा शेतमालाला न मिळणारा भाव आणि पेरणीच्या ऐन तोंडावर त्यांची खते बियाणे आणि किटकनाशकांसाठी होणारी पळापळ हे पाहून तीन गोष्टींवर काम करायचं ठरवलं. यामध्ये शेतकऱ्यांना घरपोच कीटकनाशके तणनाशके बुरशीनाशके आणि बियाणे पोच करणे. त्यासाठी त्यांनी कृषी सारथी नावाचे अॅप तयार केले आहे. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे. त्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप, यूट्यूब चॅनल आणि इतर सोशल मीडियाचा वापर करणे. तिसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव देण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न करणे. त्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं या तीन गोष्टींवर या तरुणांनी काम सुरु केलं. 

Maharashtra Agriculture News : उच्चशिक्षीत तरुणांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार, 'कृषी सारथी'च्या माध्यमातून बळीराजाला बांधावर सेवा

नेमकी कामाची सुरुवात कशी झाली

  • एप्रिल 2020 मध्ये शेतकरी व्हॉट्सॲप ग्रुपची सुरुवात केली
  • सप्टेंबर 2020 मध्ये 'कृषी सारथी' यूट्यूब चॅनेल ची सुरुवात केली. सध्या गौरी काळे या यूट्यूब चॅनल सांभाळत आहेत. त्या सध्या इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला आहेत.
  • डिसेंबर 2020 पासून अमरावती, अकोला आणि खामगाव इथे शेतकऱ्यांना भाजीपाला विकून देण्यात व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून मदत करणे
  • ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 मध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी विकून देण्यास प्रत्यक्ष मदत
  • जुलै 2022 मध्ये कीटकनाशके बुरशीनाशके तणनाशके आणि बियाणे घरपोच पोहोचविण्याची सेवा सुरु केली, यासाठी ॲप लाँच केलं
  • बुलडाणा जिल्हातील जवळ-जवळ 90  पेक्षा जास्त गावात शेतकऱ्यांना अगदी 24 तासाच्या आत आणि स्वस्त भावात घरपोच औषधे, किटकनाशके पोहोचवण्यास सुरुवात 
  • कृषी सारथीमुळं शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबली 
  • शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व कीटकनाशकं त्यांना एका कॉल किंवा क्लिक वर उपलब्ध होऊ लागली
  • 10 जुलै 2022 पासून शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारा कृषी सल्ला मोफत देण्यास सुरुवात
  • सर्व कृषी सारथीमधील काम करणारे मुले ही अभियांत्रिकी पदवी घेतलेली आहेत.

Maharashtra Agriculture News : उच्चशिक्षीत तरुणांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार, 'कृषी सारथी'च्या माध्यमातून बळीराजाला बांधावर सेवा

डिलिव्हरी करणाऱ्या मुलांची पगार देण्याचं काम  डॉ. अमित देशमुख करत आहेत

कृषी सारथीच्या मुलांनी गोळा केलेल्या थोड्या फंडामधून हे काम सुरु आहे. डिलिव्हरी करणाऱ्या मुलांची पगार ही खामगांव येथील डॉ. अमित देशमुख हे देत आहेत. ते या उपक्रमाचे Angel investor आहेत. पण आम्ही पाणी फाउंडेशन किंवा इतर मोठ्या संस्थेशी जुळलो तर अजून जास्त काम करता येईल. थोडी आर्थिक मदत या उपक्रमाला भेटली तर अजून मोठं काम करता येईल, माहिती कृषी सारथी या संकल्पनेचे संस्थापक परशराम आखरे यांनी दिली आहे.

सध्या बुलडाणा जिल्ह्यात काम सुरु, पुढच्या काळात अकोला आणि चंद्रपूरमध्ये काम सुरु करणार

सध्या कृषी सारथीचे काम हे बुलडाणा जिल्ह्यात सुरु आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतक्यांना घरपोच खते, औषधे, किटकनाशके, बियाणे पोहोचवण्याचे काम कृषी सारथीच्या माध्यमातून सुरु असल्याची माहिती परशराम आखरे यांनी दिली आहे. पुढच्या काळात वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे काम सुरु करणार असल्याची माहिती परशराम आखरे यांनी दिली आहे. 

Maharashtra Agriculture News : उच्चशिक्षीत तरुणांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार, 'कृषी सारथी'च्या माध्यमातून बळीराजाला बांधावर सेवा

संत्रा पिकासाठी विशेष उपक्रम राबवणार

जसा देवगड म्हटलं की हापूस आठवतो तसेच मोर्शी वरुड म्हटलं संत्री यायला हवा, म्हणून कृषी सारथी मागील दोन वर्षापासून काम करत आहे. मोर्शी वरुड भागातील संत्रा हा भारतातील सर्वात उच्च प्रतीचा संत्रा आहे. हा संत्रा आम्ही मागील वर्षी मुंबई आणि पुण्यातील काही सोसायट्यांमध्ये आणि काही कंपनी मध्ये दिला. ही विक्री थेट शेतकरी ते ग्राहक अशी करुन दिल्यची माहिती परशराम आखरे यांनी दिली.

Maharashtra Agriculture News : उच्चशिक्षीत तरुणांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार, 'कृषी सारथी'च्या माध्यमातून बळीराजाला बांधावर सेवा

नोकरी करत शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम 

परशराम आखरे हे सध्या आयआयटी मुंबई मध्ये Project Research Assistant म्हणून कार्यरत आहेत. तर संकेत शेगोकार हे सध्या Tata consultancy services मध्ये काम करतात. ते सध्या स्पेनमधून कृषी सारथी च काम बघतात. नयन बरडे हे सध्या General Electric मध्ये काम करतात, तर मनोज साबळे हे CDAC मध्ये शिक्षण घेत आहेत. या सर्व तरुणांनी इंजिनीयरींगचे शिक्षण घेतलं आहे. सध्या हे चारही तरुण नोकरी करत शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम करत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget