(Source: Poll of Polls)
Unseasonal Rains: अवकाळीचा तडाखा! मराठवाड्यात एकट्या एप्रिल महिन्यात तब्बल 30 हजार 305 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Marathwada Unseasonal Rain : सर्वाधिक नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाले असून ज्यात 9 हजार 229 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचं फटका बसला आहे.
Marathwada Unseasonal Rain Damage: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली असून, मराठवाड्यात (Marathwada) या एका महिन्यात तब्बल 30 हजार 305 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर ज्यात एकूण 48 हजार 299 शेतकऱ्यांना या अवकाळीचं फटका बसला आहे. विशेष एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला असून, ज्यात 9 हजार 229 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचं फटका बसला आहे. विशेष म्हणजे या एक महिन्यात 25 लोकांच अवकाळी पावसामुळे बळी गेला आहे.
एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठ्याप्रमाणावर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या एका महिन्यात तब्बल 30 हजार 305 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ज्यात आठही जिल्ह्यातील 3 हजार 183 हेक्टरवरील जिरायत पिकांचे नुकसान झाले असून, 22 हजार 978 हेक्टरवरील बागायत, तर 4 हजार 143 हेक्टरवरील फळपिके असे एकूण 30 हजार 305 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर आतापर्यंत 20 हजार 329 हेक्टरवरील नुकसानीचेपंचनामे पूर्ण झाले आहे. म्हणजेच आतापर्यंत 67.08 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?
नुकसानभरपाईची मागणी...
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र त्यानंतर एप्रिल महिन्यात देखील सुरवातीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्यात बागायत, जिरायत, फळपिके आणि भाजीपाल्याचं नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक आकडेवारी! मराठवाड्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 25 जणांचा मृत्यू