एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

महिनाभरात निर्णय घ्या, अन्यथा भर सभेत शेतकरी राजकीय नेत्यांना जाब विचारणार; शेतकरी प्रश्नावरुन अनिल घनवट आक्रमक

शेती प्रश्नासंदर्भात शासनाने तातडीने उपाय योजना न केल्यास गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी दिला.

Agriculture News : शेती प्रश्नासंदर्भात शासनाने तातडीने उपाय योजना न केल्यास गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन अहमदनगर जिल्हाधिकऱ्यांना दिल्याची माहिती घनवटांनी दिली. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, परंतू सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडवल्या नसल्याचे घनवट म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे नेतृत्वाखाली राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी घनवट बोलत होते. 

एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरीकडं निर्यातबंदीसारखे निर्णय

महाराष्ट्रातील शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे. एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत तर दुसरीकडे सरकार निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी, बेसुमार आयती करून शेतीमालाचे भाव पाडत आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखे किरकोळ कर्जमाफी देत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, परंतू, सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे अनिल घनवट म्हणाले. 

नेमक्या मागण्या काय?

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी उठवावी आणि शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा, सक्तीची कर्जवसुली बंद करुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतीसाठी पूर्णवेळ आणि पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पीक विमा या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे अनिल घनवट म्हणाले.

 राजकीय नेत्यांना शेतकरी भर सभेत जाब विचारतील

दरम्यान, पुढच्या एका महिन्यात राज्य शासनाने वरील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी काही उपाययोजना केल्या नाहीत तर गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकरी भर सभेत जाब विचारतील असा इशारा निवेदनाद्वारे शासनाला दिला. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, लालासाहेब सुद्रिक, इंदुबाई ओहोळ यांच्यासहआदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture Export : कृषी निर्यात आता 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठणार, येत्या 6 वर्षात होणार मोठा विक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Embed widget