Anil Bonde : तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य; अनिल बोंडेंनी केलं समर्थन
तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी केलेल्या वक्तव्याचे भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी समर्थन केले आहे. तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांनी जे वक्तव्य केलंय त्यामध्ये तथ्य असल्याचे बोंडे म्हणालेत.
Anil Bonde : तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांनी जे वक्तव्य केलंय त्यामध्ये तथ्य आहे. महाराष्ट्रात रात्री 11 ते सकाळी 9 यावेळेत वीजपुरवठा केला जातो. त्यामुळं शेत ओलीत कसं करायचं? दिवसा वीजपुरवठा खंडीत असतो असे मत भाजप नेते डॉ.अनिल बोंडे यांनी व्यक्त केलं. शेतीला सलग 8 तास वीजपुरवठा केला तरच शेतकऱ्यांना पिकं वाचवणं शक्य असल्याचे बोंडे यावेळी म्हणाले. हे सरकार शेतकऱ्याचं दुश्मन झालं असल्याचा आरोपही बोंडे यांनी यावेळी केला.
एका ट्रान्सफॉर्मरवर अनेक कनेक्शन असल्यानं ट्रान्सफॉर्मर बंद पडते. 80 टक्के बील भरल्याशिवाय ते सुरू होत नाही. मोर्शी वरुड तालुक्यातील सोलर प्रोजेक्ट अद्यापही बंद असल्याचे बोंडे म्हणाले.
शेतकरी आपला जीव धोक्यात घालून शेती करीत आहे. म्हणून जर शेतकरी तेलंगणात शेती खरेदी करत असतील तर त्यांच्या वक्तव्यात काही चूक नाही. हे सरकार शेतकऱ्याचं दुश्मन झालं असल्याचा आरोपही यावेळी अनिल बोंडे यांनी केला. महाराष्ट्रात या सरकारनं शेतकऱ्यांना सळो की पळो करुन सोडलं आहे. दिवसा वीज खंडीत असते. बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर लवकर दुरुस्त करत नाहीत. पंधरा पंधरा दिवस ते दुरुस्त केले जात नाहीत. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून सोलर प्रोजेक्ट आणला होता. मात्र, या सरकारने सगळेच बंद केल्याचा आरोप बोंडे यांनी केला. आज शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते तेलंगणाचे अर्थमंत्री
वीज टंचाईमुळे त्रस्त असलेले महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणात शेती विकत घेत असल्याचे वक्तव्य तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी केले. महागड्या विजेमुळे उद्योजक कर्नाटकात जात आहेत, तर मराठी शेतकरी तेलंगणात येत आहेत. शेतीसाठी 24 तास वीज पुरवठ्याच्या दृष्टीने तेलंगणातील जमिनीत शेतकरी गुंतवणूक करत असल्याचे टी हरीश राव यांनी सांगितलं. सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा होत आहे. हा वीजपुरवठा देखील टप्प्यात होत आहे. तेलंगणामध्ये ज्या योजना राबवल्या जात आहेत, त्या देशात इतरत्र कुठेही दिसू शकत नाहीत, असेही हरीश म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- T. Harish Rao : शेतीसाठी 24 तास वीज असल्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगणात शेती खरेदी, तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांचा दावा
- दुष्काळी गाव म्हणून जिथं लग्नासाठी मुली देण्यासही नकार दिला जायचा! असं दुष्काळी हिंगणगाव झालं पाणीदार