Success Story: स्पर्धा परीक्षांची तयारी फसली पण गडी खचला नाही, 2.5 एकरात तैवान पेरूतून घेतलं 14 लाखांचं उत्पन्न
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पारंपरिक पिकांना फाटा देत या तरुणांना मोठ्या हिमतीने तैवान पेरू सारख्या फळ पिकाची लागवड केली.
Success Story: राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांसाठी परीक्षेत पास होणं, प्रशासकीय सेवांमध्ये रुजू होणं हे मोठं स्वप्न असतं. या परीक्षेच्या तयारीत वर्षानुवर्ष मेहनत करण्याची धमक दाखवतच तरुण चिकाटीने पुढे जाताना दिसतात. पण परीक्षेत यश न मिळाल्याने खचून जाणारेही तरुण दिसतात. पण धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाठसावंगीच्या एका उच्चशिक्षित तरुणांनं 3 वर्ष परीक्षेची तयारी फसल्यानंतरही हिंमत दाखवत शेतीत तैवान पेरूची लागवड केली आणि 14 लाख रुपयांचे उत्पन्न कमावत आर्थिक प्रगती साधली आहे. (Taiwan Guava Farming)
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पारंपरिक पिकांना फाटा देत या तरुणांना मोठ्या हिमतीने तैवान पेरू सारख्या फळ पिकाची लागवड केली. लालसर गुलाबी दिसणाऱ्या पेरूतून तब्बल 30 टन पेरूचे उत्पन्न मिळवण्यात हा तरुण यशस्वी झालाय. या तरुणाचं परिसरात कौतुक होत आहे.
किती खर्च, किती नफा?
भूम तालुक्यातील बाळासाहेब नाईकिंदे या पदवीधर तरुणाने बार्शी मध्ये तीन वर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी केली. पण स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळाल्याने त्यांनी शेतीत उतरण्याचं ठरवलं. नोकरीच्या मागे न धावता शेतीची काच धरत 20 जुलै 2023 मध्ये अडीच एकर क्षेत्रावर तैवान पेरूची लागवड बाळासाहेबांनी केली. विशेष म्हणजे पहिलाच वर्षी त्यांना 30 टन पेरूचे उत्पादन मिळालं. त्यातून दहा लाख रुपयांची कमाई त्यांनी केली. चालू वर्षात हे उत्पादन 40 टनांवर गेला असून सध्या या तरुणाच्या तैवान पेरूंना बाजारपेठेत चांगला दर मिळतोय. खर बघित आतापर्यंत बारा लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळवला असून पेरूची काढणी झाल्यानंतर आणखी चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. या अडीच एकर पेरूसाठी एकूण चार लाख रुपये त्यांना खर्च आला. केवळ सात महिन्यांमध्ये हा खर्च वगळून 10 लाख रुपयांचा नफा त्यांनी मिळवलाय.
कसं केलं पेरूच्या बागेचं नियोजन?
बाजारपेठेत तैवान पेरूच्या जातीला मिळणारा भाव चांगला असल्याचं लक्षात आल्यानंतर या तरुणाने अडीच एकर क्षेत्रामध्ये हर्टी तैवान पेरूची लागवड केली. या पेरूच्या बागेत योग्य व्यवस्थापन ठेवत भरघोस उत्पन्न त्यांनी मिळवलंय. बागेच्या फवारणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करत बाळासाहेबांनी संपूर्ण बागेला रासायनिक आणि इतर मिश्र खतांचा वापर करत शेणखतही दिले. योग्य व्यवस्थापन आणि अचूक कालावधीत दर्जेदार पेरूचे उत्पादन मिळवल्याने त्यांना बाजारपेठेतही चांगला फायदा झालाय. केवळ राज्याच्याच बाजारपेठेत नाही तर चेन्नई तिरुपती व हैदराबादच्या मार्केटमध्येही ते पेरू विक्रीसाठी पाठवतात. शेताच्या बांधावर येऊन व्यापारी त्यांच्या पेरूची खरेदी करत असल्याने वाहतूक खर्च कमिशन अशा खर्चांपासून वाचत मोठ्या प्रमाणावर ते नफा मिळवतायत.
हेही वाचा: