एक्स्प्लोर

AI नं संत्रा बागेचं अर्थकारणच पालटलं ! 5 लाखांचे 25 लाख झाले ; अमरावतीच्या विजय बिजवेंनी नेमकं काय केलं ?

विजय बिजवे यांची 8 एकरांची संत्रा बाग आहे. 10 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने बागायत करत असताना त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नव्हतं.

Nagpur: आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शेतीत योग्य वापर केल्याने काय करिश्मा होऊ शकतो, हे अमरावती जिल्ह्यातील खरपी गावातील संत्रा उत्पादक शेतकरी विजय बिजवे यांनी दाखवून दिलं आहे. दोन वर्षांपूर्वी आर्थिक नुकसान आणि निराशेमुळे संत्रा बाग तोडण्याचा निर्णय घेतलेल्या अमरावती जिल्ह्यातील विजय बिजवे या शेतकऱ्याने त्यांच्या मुलाच्या आग्रहावरून शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला आणि बागेत नवा बहर आला. पूर्वी केवळ 4–5 लाख रुपयांचे उत्पन्न देणारी संत्रा बाग आता तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचे उत्पादन देईल, असा विश्वास बिजवे यांनी व्यक्त केला आहे.

परतवाडा तालुक्यातील खरपी गावात विजय बिजवे यांची 8 एकरांची संत्रा बाग आहे. 10 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने बागायत करत असताना त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नव्हतं. मात्र B.Sc. Agriculture करणाऱ्या मुलाने AI वापरण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर शेतीत क्रांती झाली.

 नेमकं केलं काय या शेतकऱ्यानं?

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातील खरपी गावात विजय बिजवे यांची 8 एकरांची संत्रा बाग आहे. मागील 10 वर्षांपासून ते पारंपरिक पद्धतीने बागायत करत होते. मात्र, खर्च आणि उत्पन्नाचं गणित जमत नव्हतं. त्यामुळे त्यांनी बाग तोडण्याचा विचार केला होता. मात्र B.Sc. Agriculture करणाऱ्या मुलाच्या आग्रहामुळे त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून AI तंत्रज्ञानाचा अवलंब केला.  AI वापरण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम शेतीचं गुगल मॅपिंग केलं आणि पुण्यातील "Map My Crop" कंपनीच्या मदतीने काही सेन्सर बसवले. या सेन्सरमधून पाण्याची उपलब्धता, मातीचा ओलावा, तापमान आणि आवश्यक पोषकतत्त्वांची माहिती मिळू लागली. त्यानुसार त्यांनी झाडांना आवश्यक तेवढंच पाणी व औषधं वापरायला सुरुवात केली. परिणामी खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं. सध्या बिजवे यांच्या प्रत्येक झाडावर 800 ते 1200 संत्री लागलेली आहेत. AI तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी त्यांचा खर्च सुमारे 5.5 लाख रुपये आणि उत्पन्न 5 ते 6 लाख रुपये होतं. आता त्यांचा खर्च 4 लाखांपर्यंत आला असून उत्पन्न 25 ते 30 लाख रुपये होण्याची शक्यता आहे.

AI तंत्रज्ञान वापरणं थोड्या प्रशिक्षणानेही शक्य

बिजवे यांच्या म्हणण्यानुसार, AI तंत्रज्ञान वापरणं कोणत्याही शेतकऱ्यासाठी कठीण नाही. थोडं प्रशिक्षण घेतल्यास अल्पशिक्षित शेतकरीही याचा प्रभावी वापर करू शकतो. त्याशिवाय, त्यांनी रासायनिक फवारणी न करता गूळ, साखर आणि दूध यांच्या मिश्रणाची फवारणी केली, त्यामुळे मधमाशांचा वावर वाढला आणि परागसिंचन अधिक प्रभावी झालं. परिणामी फळांची वाढ आणि गुणवत्ताही सुधारली. जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांच्यानुसार, AI तंत्रज्ञानामुळे शेतीतील सर्वेक्षण, सिंचन आणि खत व्यवस्थापन अचूकपणे करता येतं. त्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ शक्य आहे. मात्र, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्केटिंगची सुविधा मिळावी यासाठी अमरावतीत प्रक्रिया प्रकल्प आणि मोठ्या बाजारपेठांशी थेट संपर्काची गरज आहे.

हेही वाचा

माझ्या धन्याच्या खांद्यावरचं जू उतरलं, माऊलीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, लातूरच्या 75 वर्षीय शेतकऱ्याला अशी मिळाली बैलजोडी

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनी धरणातून सीना नदीला पाणी सुटणार, मंत्री विखे पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनी धरणातून सीना नदीला पाणी सुटणार, मंत्री विखे पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश
Jalgaon Farmers News : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Embed widget