Tomato Price : टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, किलोला मिळतोय दोन रुपयांचा दर; शेतकऱ्यांना मोठा फटका
Tomato Price : सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक किलो टोमॅटोला दोन रुपयांचा दर मिळत आहे.
Tomato Price : सध्या देशातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक किलो टोमॅटोला दोन रुपयांचा दर मिळत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम पिकांवर झाला आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे.
प्रति कॅरेट टोमॅटोला केवळ 150 ते 200 रुपयांचा दर
उत्तर प्रदेशमध्ये टोमॅटो उत्पादक शेतककऱ्यांना मोठा फटका बसत आहे. टोमॅटोच्या दरात दिवसेंदिवस घट होत असल्याचं चित्र दिसत आहे. टोमॅटोचे दर हे किलोमागे दोन रुपयांवर पोहोचले आहेत. उष्णतेचा परिणाम सर्वच भाज्यांवर झाल्याचे दिसून येत आहे. पण याचा सर्वाधिक फटका टोमॅटोला बसला आहे. गेल्या वर्षी टोमॅटोला 400 ते 500 रुपये प्रति कॅरेटचा भाव शेतकऱ्यांना मिळत होता. मात्र, यावेळी प्रति कॅरेट टोमॅटोला केवळ 150 ते 200 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
हवामान बदलाचा शेती पिकांना फटका
देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे. त्यामुळं शेती तोट्याची ठरत आहे. गेल्या खरीप हंगामात पूर, पाऊस आणि दुष्काळानं शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी केली होती. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. यावर्षी मार्चमध्येही पाऊस आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, मोहरीच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आचा टोमॅटो उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत.
टोमॅटो शेतताच लागली सडू
सध्या टोमॅटो बाजारात विकून शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आमचा खर्चही यातून निघत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांची मोठी मेहनत आहे, मात्र सध्या दर कमी मिळत असल्याचे शेतकरी म्हणाले. दर कमी असल्यामुळं अनेक शेतकरी टोमॅटो तोडत नाहीत. त्यामुळं शेतातच टोमॅटो सडू लागली आहेत.
बाजारात टोमॅटोही फेकले
टोमॅटोला सध्या दोन ते तीन रुपयांचा दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव 5 रुपये किलोपर्यंत आहे. बाजारात टोमॅटो विकायला गेलेले शेतकरी हैराण झाले आहेत. अनेकवेळा टोमॅटो विकला जात नाही आणि तो खराब होऊ लागल्यावर तो बाजारातच फेकून द्यावा लागतो. मात्र, त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे. अत्यंत स्वस्त दरात टोमॅटोची खरेदी केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: