Agriculture News : हरभऱ्यासाठी पोषक वातावरण, एकरी पाच ते सात क्विंटलचा उतार; दरात सुधारणा झाल्यानं शेतकरी समाधानी
Agriculture News : सध्या हरभरा पिकासाठी (Gram Crop) वातावरणही पोषक आहे. त्यामुळं एकरी हरभऱ्याचे पाच ते सात क्विंटल विक्रमी उत्पन्न येत आहे.
Agriculture News : यावर्षी उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या हरभरा पिकासाठी (Gram Crop) वातावरणही पोषक आहे. त्यामुळं एकरी हरभऱ्याचे पाच ते सात क्विंटल विक्रमी उत्पन्न येत आहे. तर विविध वाणानुसार हरभऱ्याला सात हजार ते 12 हजार रुपयापर्यंतचा बाजार भाव मिळत आसल्यानं शेतकरी (Farmers) समाधानी आहेत. दरम्यान, बाजारात हरभऱ्याची आवक वाढल्यानंतरही दर कायम राहावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Nandurbar : नंदूरबार जिल्ह्यात 30 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी
रब्बी हंगामात एकट्या नंदूरबार जिल्ह्यात 30 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी हरभरा पिकासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळं हरभऱ्याचे एकरी पाच ते सात क्विंटल विक्रमी उत्पन्न येत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. उभी पीकं जमिनदोस्त झाली होती. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. मात्र, आता रब्बी हंगामात हरभरा पिकासाठी पोषक वातावरण आहे. यामुळं शेतकऱ्यांना हरभऱ्याचा विक्रम उतारा मिळत आहे.
चांगला दर असल्यानं शेतकरी समाधानी
हरभऱ्याचे एकरी पाच ते सात क्विंटल असे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. एकरी सात हजार रुपयापर्यंतचा खर्च हरभरा पिकासाठी आहे. उत्पादन चांगलं असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. हरभऱ्याला प्रतवारीनुसार, 7 हजार रुपयांपासून ते 12 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. रब्बी हंगामात एकरी हरभरा पिकाच्या क्षेत्रात खर्च वजा जाता तीस ते चाळीस हजार रुपयांचे उत्पादन मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
Gram Price : आवक वाढल्यानंतरही हरभरा पिकांच्या किंमतीत घट येऊ नये
यावर्षी रब्बी हंगामातील पिकांचे विक्रमी उत्पादन येत असले तरी बाजार समितीमध्ये आवक वाढल्यानंतर हरभरा पिकाच्या किमती मध्ये घट येऊ नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सध्या तरी हरभरा पिकाला चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी आहेत. मात्र, हा दर कामय राहणार का? प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Nafed : हिंगोली जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर खरेदी सुरु करावी
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अद्यापही हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या (Nafed) केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी हिंगोलीत हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जातात. पण अद्याप त्याबाबत हालचाल झालेली दिसत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या: