एक्स्प्लोर

Jackfruit Farming : एकदा लागवड करा वर्षानुवर्षे नफा मिळवा, कशी कराल फणस शेती; वाचा सविस्तर

Jackfruit Farming : वर्षानुवर्ष नफा मिळवण्यासाठी अनेक शेतकरी फणसाची लागवड (Jackfruit cultivation) करत आहेत. फणसाची लागवड करुन शेतकऱ्यांना यामाध्यमातून चांगला नफा मिळवता येतो.

Jackfruit Farming : शेतकरी (Farmers) सातत्यानं आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. पारंपारीक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पद्धतीनं शेती करुन चांगल उत्पन्न मिळवतात. वर्षानुवर्ष नफा मिळवण्यासाठी अनेक शेतकरी फणसाची लागवड (Jackfruit cultivation) करत आहेत. फणसाची लागवड करुन शेतकऱ्यांना यामाध्यमातून चांगला नफा मिळवता येतो. बाजारात फणसाला मोठी मागणी देखील असते. फळ म्हणून आणि भाजी करण्यासाठी देखील फणसाचा वापर केला जातो. पाहुयात फणसाच्या लागवडीबद्दल सविस्तर माहिती...

दरवर्षी सारख्याच पिकांची लागवड करुन कंटाळलेल्या शेतकरी बांधवांसाठी कृषी क्षेत्रात काही वेगळे करायचे असेल तर ते फणसाची लागवड करु शकतात. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. फणसाचा उपयोग हा भाजीपाला आणि फळ म्हणून देखील केला जातो. त्यामुळं बाजारात फणसाला मोठी मागणी असते. अनेक ठिकाणी फणसाचे लोणचेही केले जाते. जे खायला खूप चवदार असते. बाजारपेठेत जास्त मागणी असलेल्या भाज्यांपैकी फणस एक आहे.

कोणत्याही हंगामात फणसाची लागवड करता येते

देशातील विविध राज्यांमध्ये फणसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यामध्ये  झारखंड, बिहार, पश्‍चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. याशिवाय इतरही अनेक राज्यांमध्ये देखील फणसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. फणसाच्या लागवडीसाठी विशीष्ट कोणता कालावधी नाही. कोणत्याही हंगामात आपण फणसाची लागवड करु शकतो. चिकणमाती जमीन फणसाच्या लागवडीसाठी चांगली मानली जाते. फणसाच्या शेतीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन गरजेची असते. लागवड करताना शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. 

फणसाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करणं गरजेचं

फणसाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करणं गरजेचं असतं. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली नांगरणी करावी. त्यानंतर जमिनीत शेण खत टाकावा. त्यानंतर आता समान अंतरावर खड्डे खणून फणसाचे रोपे लावावी. दर 15 दिवसांनी फणसाच्या रोपांना पाणी द्यावं. फणसाच्या झाडांसाठी शेतकरी शेवग्याचे कंपोस्ट आणि कडुनिंबाची पेंडही खत म्हणून वापरु शकतात.

फणस हे आरोग्यासाठी चांगले

फणस हे आरोग्यासाठी चांगले असते. फणसामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, नियासिन अशी अनेक जीवनसत्त्वे यामध्ये आढळतात. यासोबतच फणसात कॅल्शियम, सोडियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक ही खनिजे असतात. त्यामुळं फणसाला सदाहरित पिकं देखील म्हणतात. जर तुम्ही बिया टाकून फणसाची लागवड करत असाल तर फळ येण्यास सहा वर्षांचा कालावधी लागतो. तर गुटी पद्धतीने लागवड केल्यास फार कमी कालावधीत फणसाला फळे येतात. एक हेक्टरमध्ये सुमारे 140 ते 150 फणसाची रोपे लावली जातात. शेतकरी बांधव केवळ एक हेक्टरमध्ये फणसाची लागवड करुन लाखो रुपयांचा नफा मिळवू शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या:

Yavatmal: फणस शेतीतून साधलीय आर्थिक उन्नती, विदर्भातील शेतकऱ्याने घेतलं लाखोंचं उत्पन्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget