Onion News : कांद्याला जाहीर केलेलं 350 रुपयांचं अनुदान तात्काळ द्या, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा येवला तहसीलवर मोर्चा
कांद्याला (onion) जाहीर केलेले 350 रुपयांचं अनुदान तात्काळ द्यावं, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं येवला तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.
Onion News : कांद्याला (onion) जाहीर केलेले 350 रुपयांचं अनुदान तात्काळ द्यावं, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील येवला तहसीलवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्वाभिमानीचे महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली.
या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरुन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कांद्याला जाहीर केलेले 350 रुपयांचं अनुदान तात्काळ द्या, भोगवाटवर्ग 2 च्या जमीनीवर पिक कर्ज उपलब्ध करून द्यावं. घरकुल 1 लाख 38 हजार रुपयावरुन 3 लाख रुपये करण्यात यावं. निराधार अपंग विधवा घडस्पोटीत महीलांच्या प्रकरणातील जाचक अटी रद्द करा या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं नाशिकच्या येवला तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानीचे महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. मोर्चा वाजत-गाजत तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तहसीलदार आबा महाजन यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर
अनेक राज्यांमध्ये कांद्याची पेरणी केली जाते. राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशचा 16 टक्के वाटा आहे. कर्नाटक आणि गुजरातचा वाटा सुमारे 9 टक्के आहे. खरीप हंगाम, खरीप हंगाम सरताना आणि रब्बी हंगामात असे वर्षातून तीन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते. देशभरातील कांद्याच्या काढणीच्या वेळेमुळे वर्षभर ताज्या कांद्याचा नियमित पुरवठा होतो. परंतु काहीवेळा हवामानाच्या अनियमिततेमुळे एकतर साठवलेला कांदा खराब होतो किंवा पेरणी केलेल्या क्षेत्राचे नुकसान होते. ज्यामुळे पुरवठ्यात अडथळे येतात आणि देशांतर्गत किमती वाढतात.
गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले होते. याचा सर्वाधिक मोठा फटका नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता. नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका कांद्यासह इतर पिकांना बसला होता. फळबागांचेही मोठे नुकसान झाले होते. या फटक्यातून शेतकरी सावरत असतानाच आता कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: