(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतीसाठी वय नाही हिमंत लागते, YouTube चा व्हिडीओ पाहून ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग; 75 वर्षीय शेतकऱ्याची यशोगाथा
एका 75 वर्षीय शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतकऱ्यानं YouTube च्या साथीनं ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
Dragon Fruit : शेतकरी आपल्या शेतीत विविध प्रयोग करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध संकटावर मात करत आहेत. अशाच एका 75 वर्षीय शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. झारखंडमधील या शेतकऱ्यानं YouTube वर ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा व्हिडीओ पाहिला होता. त्यानंतर त्यांनी ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पाहुयात त्यांचा ड्रॅगन फ्रूट शेतीतला प्रयोग.
योग्य नियोजन केल्यास ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती
झारखंडमधील जमशेदपूर येथे राहणाऱ्या 75 वर्षीय रामकृष्ण सुबेका यांनी ड्रॅगन फूट शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी या पिकाची लागवड केली आहे. योग्य नियोजन केल्यास आपण ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती करु शकतो हे रामकृष्ण सुबेका यांनी दाखवून दिले आहे. तसेच शेती करण्यास कोणतेही वय नसते हे देखील त्यांनी दाखवून दिलं आहे.
2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान ड्रॅगन फ्रूटची लागवड
ड्रॅगन फ्रटची लागवड करून रामकृष्ण यांनी त्यांच्या जमिनीत केवळ भातच नाही तर विदेशी फळ ड्रॅगन फ्रूटचेही उत्पन्न होऊ शकते हे दाखवून दिले आहे. रामकृष्ण सांगतात की, यूट्यूबवर 2020 मध्ये प्रथम ड्रॅगन फ्रूटचा व्हिडीओ पाहिला होता. त्यानंतर ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रामकृष्ण यांनी दिली. ड्रॅगन फ्रूटची शेती आजच्या काळात यशस्वी शेतीचे उत्कृष्ट मॉडेल बनली आहे. शेती करुन शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत आहेत. 75 वर्षीय रामकृष्ण सुबेका हे नक्षलग्रस्त भाग असलेल्या चकुलियामध्ये शेती करतात. येथे ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड करून त्यांनी दाखवून दिले आहे की यशासाठी वयाची अट नसते, फक्त हिंमत लागते. शेतकरी रामकृष्ण सुबेका यांनी 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान ड्रॅगन फ्रूटची शेती सुरू केली.
बांगलादेशमधून ड्रॅगन फ्रूटची रोपे मागवली
रामकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूट्यूबवर ड्रॅगन फ्रूटचा व्हिडीओ पाहिल्यानंतर 2020 मध्ये त्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी बांगलादेशातून रोपे मागवली आणि त्यांची लागवड सुरू केली. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी सुरुवातीच्या टप्प्यात हा उपक्रम हलकासा घेतला. घरच्यांनी त्याची चेष्टा केली, मात्र त्यांनी कोणाचीही पर्वा न करता पूर्ण माहिती मिळताच ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरू केली.
ड्रॅगन फ्रूटची गणना सुपर फ्रूट्समध्ये
रामकृष्ण यांच्या मेहनतीला फळ मिळाले आहे. त्यांना यातून चांगले उत्पादन मिळत आहे. आता येत्या काही वर्षात या लागवडीतून 10 लाखांहून अधिक नफा मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे. यापूर्वी कोरोनाच्या काळात डॉक्टरांच्या सल्ल्याने लोकांनी या फळाचा वापर केला होता. आता डेंग्यूच्या काळातही या फळाला खूप मागणी आहे. कारण हे फळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. ड्रॅगन फ्रूट एक सुपर फळ म्हणून गणले जाते, कारण त्यात अनेक रोगांशी लढण्याची क्षमता आहे. हे फळ अमेरिकेने सर्वप्रथम शोधले. अमेरिकेत या फळाला पिटाया फळ म्हणून ओळखले जाते. त्यानंतर चीनमध्ये या फळाची लागवड सुरू झाली आणि चीनने त्याला ड्रॅगन फ्रूट असे नाव दिले.
लाखों रुपयांची कमाई
रामकृष्ण सुबेका सांगतात की, त्यांनी दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात शेती करायला सुरुवात केली होती. इंटरनेटवर पाहिल्यानंतर त्यांना समजले की, हे अतिशय फायदेशीर फळ आहे. ज्याची लागवड फक्त चीनमध्ये केली जाते. त्यानंतर त्यांनी शेती करण्याचे ठरवले. बांगलादेशातून रोपे आयात करुन शेती सुरु केली. पीक तयार झाल्यानंतर पहिल्या वर्षीच त्यांना 50 हजारांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. पण आता ही कमाई लाखात असेल. एका झाडाला 20 वर्षे फळे येतात आणि त्यातून एक लाखापर्यंत कमाई होते, असे त्यांनी सांगितले. रामकृष्ण यांचा मुलगा प्रवीण कुमार यांनी सांगितले की, सुरुवातीला तो घाबरला होता, पण जेव्हा झाडे वाढली आणि फळे येऊ लागली तेव्हा त्याला चांगले उत्पन्न मिळू लागले. दोन वर्षांत त्यांनी या लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Nashik Farmers : गुगल, युट्युबला जवळ केलं! नाशिकच्या शेतकऱ्याचा ड्रॅगन फ्रुट शेतीचा भन्नाट प्रयोग, दुष्काळावर केली मात