एक्स्प्लोर

Papaya : पपईला चांगला दर, मात्र विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला; नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

Agriculture News : पपईच्या पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Agriculture News : राज्यातील शेतकरी (Farmers) सध्या विविध संकटांचा सामना करत आहेत. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट येत आहे. पपईला (papaya) सध्या बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. मात्र, पपईच्या पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. रोगांच्या प्रादुर्भावामुळं पपईची पाने गळून फळे उघडी पडण्याची भीती असते. त्यामुळं फळ खराब होण्याचे प्रमाण वाढते. पपईवर आलेल्या या रोगामुळं पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पपई उत्पादकांसाठी दुष्काळात तेरावा महिना

देशातील सर्वात मोठा पपई हब म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. यावर्षी पपईला चांगला दर मिळत आहे. मात्र, पपईच्या बागांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पपईच्या बागा चांगल्या बहरल्या आहेत. पपईला दरही चांगला मिळत आहे. 11 रुपये प्रति किलोने व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावरून पपई खरेदी करत आहेत.  शेतकऱ्यांचा आर्थिक गणिते गतिमान होण्यासाठी हे दर चांगले असले तरी दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशी गत पपई उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. मागील आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरण आणि पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. विषाणूजन्य रोगांमुळं पपईची पाने पिवळे पळून पान गळती होते. तर दुसरीकडे पपईच्या झाडाचा शेंडा अकसून जातो. त्यामुळे पपई फळावर थेट सूर्यकिरण पडून फळ खराब होण्याची भीती जास्त असते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

पपईची पाने पिवळे पडून पानगळ सुरू

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पपईच्या बागा चांगल्या बहरल्या आहेत. मात्र पपई पिकावर रस शोषणा करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अल्टेनिया नावाचा विषाणूजन्य आजारामुळं पपईची पाने पिवळे पडून पानगळ सुरू झाल्यानं खडे उघडे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी विद्यापीठांनी सुचवलेल्या उपाययोजना करुन आपल्याला या रोगावर नियंत्रण आणता येते.

नंदुरबार जिल्ह्यात पपई संशोधन केंद्र सुरू करावं

ऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच नंदूरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन आणि कृषी विद्यापीठांनी पपई संशोधन केंद्र सुरू करावे. पपई पिकावर येणारे रोग आणि प्रक्रिया उद्योग यावर संशोधन करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा पपई उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Papaya: नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत, पपईचे दर ठरविण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेण्याची शेतकऱ्यांची मागणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आंब्याचा राजा हापूस बाजारात दाखल, एक डझनचा दर किती? 
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आंब्याचा राजा हापूस बाजारात दाखल, एक डझनचा दर किती? 
सावधान! हवामानत मोठा बदल, 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, कृषी विभागाचं आवाहन
सावधान! हवामानत मोठा बदल, 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, कृषी विभागाचं आवाहन
एका बाजूला वाढला तापमानाचा पारा, तर दुसऱ्या बाजूला अवकाळीचा मारा, राज्यातील शेतकरी चिंतेत
एका बाजूला वाढला तापमानाचा पारा, तर दुसऱ्या बाजूला अवकाळीचा मारा, राज्यातील शेतकरी चिंतेत

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Embed widget