एक्स्प्लोर

Tree Farming : कमी खर्चात लाखोंचा नफा, करा 'या' वृक्षाची लागवड; छत्तीसगड सरकारचं 100 टक्के अनुदान

देशातील वेगवेगळ्या राज्य सरकारच्या वतीनं वृक्ष लागवडीस प्रोत्साहन दिलं जात आहे. सध्या देश विदेशात लाकडांची मागणी वाढली आहे.

Tree Farming : सध्या देश विदेशात मोठ्या प्रमाणात लाकडांची मागणी (wood demand) वाढली आहे. त्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्य सरकारच्या वतीनं वृक्ष लागवडीस प्रोत्साहन दिलं जात आहे. फर्निचर, प्लायवूडपासून ते जहाज तयार करण्यापर्यंत अनेक ठिकाणी लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सध्या देशात आणि परदेशात सागवान लाकडाला (Sagwan  Farming) मोठी मागणी आहे. त्यामुळं छत्तीसगड सरकारनं (Chhattisgarh Govt) मोठा निर्णय घेतला आहे. सागवान वृक्षाची लागवड करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय छत्तीसगड सरकारनं घेतला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 

कमी खर्चामध्ये काही वर्षांमध्येच तुम्हाला जर लाखो रुपयांचा नफा मिळवायचा असले तर सागवान शेती पडवते. आपण शेतात कोणत्या प्रकारच्या वृक्षाची लागवड करतो, त्यावर नफा मिळणे अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चंदनाची मागणी खूप आहे, परंतू आजकाल सागवानालाही मोठी मागणी आहे. सागवानाच्या लाकडाचे विविध उपयोग आहेत. हे लाकून उच्च प्रतिचे आणि टिकावू असल्यामुळं सर्वच ठिकाणी त्याचा वापर केला जातो.

अनुदानाचा लाभ कसा मिळवाल? काय आहेत नियम

सागवानाची लागवड वाढवण्यासाठी छत्तीसगड सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सागवान वृक्षाची लागवड करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय छत्तीसगड सरकारनं घेतला आहे. सरकारनं मुख्यमंत्री वृक्षसंपदा योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत टिश्यू कल्चर साग, टिश्यू कल्चर बांबू, मिलिया डुबिया (मलबार कडुनिंब), चंदन, क्लोनल निलगिरी आणि इतर नगदी पिके लावण्याची योजना आहे. याद्वारे सागवान लागवडीसाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान दिलं जाणार आहे. शेतकर्‍यांना सुमारे 5 एकर जमिनीवर सुमारे 5000 रोपे लावण्यासाठी हे 100 टक्के अनुदान दिलं जाईल. मात्र, जर त्यांना 5 एकरपेक्षा जास्त जमिनीवर ही रोपे लावायची असतील तर सरकार 50 टक्के अनुदान देणार असल्याची माहिती देण्यात आली.

3 वर्षामध्ये तीन हप्त्यांत 25 हजार 500 रुपये अनुदान

  • टिश्यू कल्चर तंत्राने सागवानाची लागवड करण्यासाठी 3 वर्षामध्ये तीन हप्त्यांत 25 हजार 500 रुपये अनुदान दिलं जाईल.
  • पहिल्या हप्त्यात 11 हजार 500 रुपये, दुसऱ्या हप्त्यात 7 हजार रुपये आणि तिसऱ्या हप्त्यात 7हजार रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. 
  • एवढेच नव्हे तर या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सागवानाची रोपे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
  • यासाठी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.
  • एकदा रोपे लावल्यानंतर लाभार्थींना अनुदानाचा दुसरा आणि तिसरा हप्ता फक्त जिवंत रोपांच्या आधारावर मिळेल.

अनुदानाचा लाभ कोण घेऊ शकतो

छत्तीसगड सरकारने मुख्यमंत्री वृक्षसंपदा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यासाठी काही नियम केले आहेत. ज्यामध्ये त्यांच्या स्वत:च्या शेतीयोग्य जमीन असलेल्या जमीनमालक शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय शासकीय, निमशासकीय व शासनाशी संबंधित संस्था, खासगी शैक्षणिक संस्था, खासगी ट्रस्टच्या अशासकीय संस्था, ग्रामपंचायती आणि भाडेतत्त्वावर जमीन घेणारे शेतकरीही सागवान रोपे लावू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या:

नवीन संसद भवन म्हणजेच Central Vista मध्ये वापरणार चंद्रपूरचं सागवान लाकूड!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget