एक्स्प्लोर

आंबा महागला! दरात 30 ते 40 टक्क्यांची वाढ, प्रतिकिलोला मिळतोय 'एवढा' दर 

आंब्याच्या दरात चांगली वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरच्या (Nagpur) कळमना फळमार्केटमध्ये आंब्याच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे.

Agriculture News : सध्या आंबा (Mango) उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) चांगले दिवस आले आहेत. कारण आंब्याच्या दरात चांगली वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरच्या (Nagpur) कळमना फळमार्केटमध्ये आंब्याच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी दक्षिणेतून आलेल्या ज्या आंब्याचा दर ठोकमध्ये 40 रुपये किलो होता. यावेळेस आवक कमी झाल्याने त्याच आंब्याचा दर 60 ते 70 रुपये किलोवर गेला आहे.

अवकाळी पावसामुळं आंब्याचं मोठं नुकसान 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून नागपूरात आंब्याची आवक होते. त्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आंब्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळं दरात वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस

विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. याठिकाणी लिंबू, आंबा, तसेच भाजीपाला, केळी पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. यावर्षी आधीच बदलत्या हवामानाचा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं आंब्याचं उत्पादन कमी आहे. अशातच पुन्हा अवकाळी पावसानं तडाखा दिल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

आंबा उत्पादनात अग्रेसर असणारी राज्ये कोणती?

देशातील अनेक राज्दयात आंब्रयाचं मोठ्म्याया प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. सर्वात आघाडीवर असणाऱ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडू या पाच राज्यांचा समावेश आहे. देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी 65 टक्के उत्पादन या पाच राज्यात होते. म्हणजे फक्त 35 टक्के आंब्याचे उत्पादन हे इतर राज्यात घेतलं जातं. महाराष्ट्रात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. कोकण विभाग आंबा उत्पादनात आघाडीवर आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. दरम्यान, पहिल्या पाच राज्यात महाराष्ट्राचा नंबर लागत नाही.  आंबा हा आरोग्याच्या दृष्टीनं देखील खूप फायदेशीर आहे. आंब्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्ते असतात. त्यामुळं आंब्याच्या हंगामात आहारात मोठ्या प्रमाणात आंब्याचा वापर केला जातो. 

महत्वाच्या बातम्या:

अवकाळीचा जोर किती दिवस राहणार? पंजाबराव डखांचा अंदाज काय? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget