अर्जुन मुंडा भारताचे नवे कृषीमंत्री, नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह दोन मंत्र्यांचे राजीनामे मंजूर
केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा (Arjun munda) यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
Arjun munda : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि रेणुका सिंह सरुता यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. आता केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा (Arjun munda) यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांच्याकडे आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
अर्जुन मुंडा हे तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री
नरेंद्र सिंह तोमर यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची धुरा सोपवली आहे. अर्जुन मुंडा हे तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री होते. मे 2019 मध्ये त्यांची केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्रसिंह तोमर यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर अर्जून मुंडा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
डॉ. भारती पवार यांच्याकडे आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार
दरम्यान, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे आणि भारती प्रवीण पवार यांच्याकडेही अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून जलशक्तीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांना अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्रिपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडेही आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
President Droupadi Murmu has directed Union Minister Arjun Munda to be assigned the charge of the Ministry of Agriculture and Farmers Welfare, Union Minister Sushri Shobha Karandlaje to be assigned the charge of the Minister of State in the Ministry of Food Processing Industries,…
— ANI (@ANI) December 7, 2023






















