(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani News : तब्बल 7 वर्षानंतर शेतकऱ्यांना आले "रेशमी" दिवस! भाववाढीने शेतकरी मालामाल
एक एकर असो कि अडीच एकर, सर्वच रेशीम (silk) कोस उत्पादक शेतकरी लाखांपेक्षा जास्त पैसे कमावत आहेत
Parbhani News : पारंपरिक शेतीबरोबरच अनेक जोडधंदे शेतकरी करतोय, त्यात महिन्याकाठी हमखास उत्पन्न देणारी रेशीम शेतीही आहे, सध्या शेतकरी मात्र 'रेशीम' शेतीकडे वळले आणि कोरोनात लागलेल्या लॉकडाउनमुळे भाव अत्यंत उतरले. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच मोठं आर्थिक नुकसान झालं. परंतु तब्बल 7 वर्षांनी रेशीम कोसचे भाव वाढल्याने शेतकरी मालामाल झाले आहेत. सध्या रेशीम कोस 800 ते 900 रुपये प्रति किलो मिळत असल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना "रेशमी" दिवस आले आहेत..
रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना "रेशमी" दिवस
राज्यात मागच्या काही वर्षात रेशीम शेतीने वाढलीय. एकट्या परभणी जिल्ह्यात तब्बल 200 ते 250 हेक्टरवर शेती केली जाते, ज्यातून जवळपास 300 टन रेशीम कोष उत्पादन होते, ज्यामुळे राज्यात परभणी रेशीम उत्पादनात चौथ्या क्रमांकावर आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांनी जोपासलेल्या या रेशीम कोसचे भाव हे 150 रुपये प्रति किलोपर्यंत आले होते. मात्र सध्या याला सोन्याची किंमत मिळत आहे.
शेतकरी लाखांपेक्षा जास्त पैसे कमावत आहेत.
जालना, कर्नाटक आदी ठिकाणी 800 ते 900 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. त्यातही कोसची प्रतवारी चांगली असेल तर 920 ते 950 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. त्यामुळे एक एकर असो कि अडीच एकर सर्वच रेशीम कोस उत्पादक शेतकरी लाखांपेक्षा जास्त पैसे कमावत आहेत. त्यामुळे तब्बल 7 वर्षांनी रेशीम कोसचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. रेशीम कोसला चांगला भाव मिळाल्याने कोरोना कालखंडानंतर भाववाढीने शेतकरी मालामाल झाले आहेत
संबंधित बातम्या
Onion Rates : कांद्याचे दर अचानक प्रति किलो 14 रुपयांनी घटले! जाणून घ्या कारण
Beed News : हमालाचा मुलगा बनला PSI! खाकी वर्दीचं स्वप्न उतरलं सत्यात, मिळवले फौजदार पदाचे स्टार
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान शेतकरी बनला अब्जावधींचा मालक! सोशल मीडियावर बातमी व्हायरल