एक्स्प्लोर

Monsoon News : मान्सूनसाठी अनुकूल वातावरण, अंदमान, निकोबार बेटांसह 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

आज मान्सून अंदमान, निकोबार बेटांसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या दोन दिवसात केरळ आणि लक्षद्वीपमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Monsoon News : पुढच्या 2 दिवसात केरळ आणि लक्षद्वीपमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळात पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  दरम्यान, बंगालच्या उपसागरात विषववृत्त ओलांडून नैऋत्येकडे झेपवणारे बळकट दमदार पावसाळी वारे तसेच ताशी 45 किमी झटक्याखाली पुढील 5 दिवस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आज अंदमान, निकोबार बेटे, व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता जाणवत असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

पश्चिम बंगाल आणि  ईशान्यकडील 7 राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माहिती देखील माणिकराव खुळे यांनी दिली. पावसासाठी अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे. येत्या दोन दिवसात हे वारे दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.  

दरम्यान, दक्षिण मध्य कर्नाटकावर जमिनीपासून उंच आकाशात 4 ते 5 किमी अंतरापर्यंत असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे अरबी समुद्रावरुन येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे पुढील 5 दिवस तामिळनाडू व कर्नाटक किनारपट्टी, केरळ व माही क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेशी शक्यता देखील खुळे यांनी वर्तवली आहे. त्यानंतर हळूहळू ही लाट विरळ होईल असे त्यांनी म्हटले आहे.

या सर्व अनुकूलता जरी असल्या तरी प्रत्यक्षात मान्सूनचा पाऊस तळ कोकण व घाट ओलांडून मध्य महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला येतो. तर पूर्व मोसमी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरवातीला दोन ते चार दिवसांच्या फरकाने अपेक्षित असल्याचेही खुळे यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Embed widget