एक्स्प्लोर

Monsoon 2022 : केरळमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; 6 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Monsoon 2022 : केरळ आणि लक्षद्वीपमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळमधील 6 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Kerala Rain : केरळ आणि लक्षद्वीप पुढील पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळात पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे. येत्या दोन दिवसात हे वारे दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे. 

केरळ किनारपट्टी भागातील मच्छिमारांना अरबी समुद्रात 16 मेपर्यंत न जाण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. 

मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर केरळ प्रशासन सतर्क झाले आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. त्याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडूनही खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. आपात्कालीन यंत्रणादेखील सुसज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

यंदा मान्सून लवकर येणार 

केरळमध्ये मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे. मान्सूनची सुरूवात केरळपासून होते आणि नंतर तो हळूहळू देशभर पसरतो. त्यामुळे देशातील एकूण पावसापैकी 70 टक्के पाऊस नैऋत्य मान्सूनमधून पडतो. भारतातील निम्मी रब्बी पिके या मान्सूनवर अवलंबून आहेत.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सुप्रीम कोर्टाचा विमा कंपन्यांना दणका! नाकारलेले 227 कोटी रुपये देण्याचे निर्देश, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
सुप्रीम कोर्टाचा विमा कंपन्यांना दणका! नाकारलेले 227 कोटी रुपये देण्याचे निर्देश, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
Dhule: दुष्काळातही फायनान्स कंपन्यांची शिरजोरी; अवघ्या सोळाशे रुपयांसाठी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ; हृदयविकाराचा झटका येऊन व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू
दुष्काळातही फायनान्स कंपन्यांची शिरजोरी; अवघ्या सोळाशे रुपयांसाठी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ; हृदयविकाराचा झटका येऊन धुळ्यातील व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget