एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

World Athletics Championships 2022: रोहित यादवचं नीरज चोप्राच्या पावलावर पाऊल, 80.42 मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठली!

World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) चमकदार कामगिरीनंतर रोहित यादवनंही (Rohit Yadav) आपला दम दाखवलाय.

World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) चमकदार कामगिरीनंतर रोहित यादवनंही (Rohit Yadav) आपला दम दाखवलाय. वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप पात्रता फेरीत रोहित यादवनं पहिल्याच प्रयत्नात 80.42 मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. रोहित यादवनं त्याच्या गटात सहावं आणि दोन्ही गटात 11वं स्थान मिळवून 12 जणांच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. रोहितच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. तसेच या स्पर्धेतील अंतिम सामन्यात रोहित भारताला पदक मिळवून देईल, अशीही अपेक्षा केली जात आहे. 

भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा भालेफेकपटू दविंदर सिंह कांगनं सर्वात प्रथम अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर नीरज चोप्रानं घवघवीत यश मिळवलं. पात्रता फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात नीजर चोप्रानं 88.39 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत धडक दिलीय. नीरज चोप्राची त्याच्या कारकिर्दीतील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. आता भारतासाठी पदक जिंकण्यासाठी नीरज चोप्रा रविवारी मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार, रविवारी सकाळी 7.05 मिनिटांनी अंतिम फेरीला सुरुवात होईल.

ट्वीट-

पदक जिंकण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज
यंदाच्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला पदक मिळवून देण्यासाठी भारतीय खेळाडू पूर्ण क्षमतेनं मैदानात उतरत आहेत. भारताचे सहा अॅथलिट्स वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत पोहचले आहेत. वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये लांब उडीत श्रीशंकर, भालाफेकीत नीरज चोप्रा, रोहित यादव, महिला भालाफेकीमध्ये अन्नू राणी, ट्रिपल जंपमध्ये एल्डहोस पॉल आणि स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे यांनी अंतिम फेरीत धडक दिली आहे. यामुळं या सर्व खेळाडूंच्या प्रदर्शनावर संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Embed widget