(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: देवदत्त पडिक्कल सुसाट! कोलकात्याविरुद्ध रचला विक्रम, रोहित शर्मालाही टाकलं मागं
Devdutt Padikkal Breaks Rohit Sharma Record: ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या (IPL 2022) तिसाव्या सामन्यात राजस्थाननं कोलकात्याला (RR Vs KKR) सात धावांनी पराभूत केलं.
Devdutt Padikkal Breaks Rohit Sharma Record: ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या (IPL 2022) तिसाव्या सामन्यात राजस्थाननं कोलकात्याला (RR Vs KKR) सात धावांनी पराभूत केलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर जोस बटलरच्या झुंजार शतकाच्या जोरदार कोलकात्यासमोर 218 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलनं 18 चेंडूत 34 धावांची तुफानी खेळी केली. ज्यामुळं देवदत्त पडिक्कलनं आयपीएलमधील त्याच्या 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. या कामगिरीसह त्यानं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचं रेकॉर्ड मोडलं आहे.
देवदत्त पडिक्कलनं आयपीएलमध्ये सर्वात जलद 1000 धावांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. पडिक्कल हा ऋषभ पंतसह आयपीएलमध्ये डावाच्या आधारे सर्वात जलद 1000 धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. दोघांनी 35 डावात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. तर, रोहित शर्मानं 37 व्या डावात 1000 धावांचा पल्ला गाठला होता.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल
आयपीएलमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या नावावर आहे. त्यानं 31 डावात आयपीएलमधील 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 34 डावात हा पराक्रम केला आहे.
राजस्थानचा सात धावांनी विजय
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सला 7 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. प्रत्युरात कोलकात्याच्या संघ 210 धावांवर आटोपला.
हे देखील वाचा-
- Prasidh Krishna Vs Aaron Finch: भरमैदानात प्रसिद्ध कृष्णा आणि आरोन फिंच यांच्यात बाचाबाची, पाहा व्हिडिओ
- Pat Cummins- Mavi Catch: षटकार तर वाचवला, पण झेलही सोडला नाही; सीमारेषावर पॅट कमिन्स- शिवम मावी जबरदस्त फिल्डिंग
- RR Vs KKR: जोस बटलर थांबायचं नाव घेईना! तुफानी अंदाजात ठोकलं आयपीएल 2022 मधील दुसरं शतक