(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI vs SRH, IPL 2022: उमरान मलिकच्या वेगासमोर मुंबईचे फलंदाज ढेर, रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा 3 धावांनी विजय
MI vs SRH, IPL 2022: हैदराबादनं दिलेल्या 194 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाची दमछाक झाली.
MI vs SRH, IPL 2022: मुंबईविरुद्ध (Mumbai Indians) सामन्यातही सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) वेगवान गोलंदाज उमरान मलिकनं (Umran Malik) चमकदार कामगिरी करून दाखवली. या सामन्यात त्यानं मुंबईच्या तीन महत्वाच्या फलंदाजानं आपल्या जाळ्यात अकडलं. ज्यामुळं हैदराबादच्या संघाला सामन्यावर मजूबत पकड मिळवता आली. हैदराबादनं दिलेल्या 194 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाची दमछाक झाली. मुंबईनं 20 षटकात सात विकेट्स गमावून 190 धावा केल्या. हा सामना हैदराबादच्या संघानं तीन धावांनी जिंकला.
हैदराबादच्या संघानं दिलेल्या 194 लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशननं पहिल्या विकेट्ससाठी 95 धावांची भागिदारी केली. परंतु, वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर अकराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. त्याचं दोन धावांनी अर्धशतक हुकलं. त्यानंतर ईशान किशन उमरान मलिकेचा गोलंदाजीचा शिकार ठरला.
दरम्यान, डेनियल सॅम्स आणि तिळक वर्माला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर मैदानात आलेल्या टीम डेव्हिडनं संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ही अठराव्या षटकात धावचीत झाला. त्यानंतर मुंबईच्या कोणत्याही फारशी चमक दाखवता आली नाही. मुंबईच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 190 धावा केल्या. हैदराबादकडून उमरान मलिकनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
नाणेफेक गमावून हैदराबादच्या संघाची सुरुवात खराब झाली. हैदराबादच्या डावातील तिसऱ्या षटकात अभिषेक शर्माच्या (10 चेंडू 9 धावा) रुपात संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर प्रियम गर्ग आणि राहुल त्रिपाठीनं संघाचा डाव सारवला. दोघांमध्ये 78 धावांची भागेदारी झाली. परंतु, रमनदीप सिंहच्या गोलंदाजीवर दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर प्रियम गर्ग (26 चेंडू 42) बाद झाला.
या सामन्यात राहुल त्रिपाठी आणि निकोलस पूरननं चांगली फलंदाजी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. रिले मेरेडिथनं सतराव्या षटकात निकोलस पूरनला (22 चेंडू 38 धावा) आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर राहुल त्रिपाठीही (44 चेंडू 76 धावा) बाद झाला. मुंबईकडून रमनदीप सिंह सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. डेनियल सॅम्स, मेरेडिथ आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
हे देखील वाचा-
- Shikhar Dhawan: शिखर धवनची थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री? 'या' दिवशी त्याचा पहिला चित्रपट होणार प्रदर्शित
- MI vs SRH, Pitch Report : मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
- IPL 2022: उमरान मलिक इतर वेगवान गोलंदाजांपेक्षा वेगळा कसा? इयान बिशपनं सांगितलं कारण