एक्स्प्लोर

IND vs SA: भारतानं दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप देण्याची संधी गमावली; अखेरच्या सामन्यात 49 धावांनी पराभव

IND vs SA 3rd T20 Match Highlights: रिले रोसो (Rilee Rossouw)- क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 20 षटकात तीन विकेट्स गमावून भारतासमोर 228 धावांचं लक्ष्य ठेवलं.

IND vs SA 3rd T20 Match Highlights: रिले रोसो (Rilee Rossouw)- क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 20 षटकात तीन विकेट्स गमावून भारतासमोर 228 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. इंदोरच्या (Indore) होळकर स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 49 धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतानं आधीच ही मालिका आपल्या खिशात घातली. दरम्यान,विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुलच्या (KL Rahul) अनुपस्थितीत भारतीय संघ तिसरा टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. भारताकडून दिनेश कार्तिकनं एकाकी झुंज दिली. त्यानं संघासाठी 21 चेंडूत 46 धावांचं योगदान दिलं.

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची खराब सुरुवात झाली. भारताच्या डावातील दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा आऊट झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यरनं आपली विकेट्स गमावली. ऋषभ पंतही 14 चेंडूत 27 धावा करून माघारी परतला. त्यानंतर दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीनं भारतीय संघाच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या. परंतु, सातव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर केशव महाराजनं त्याला क्लीन बोल्ड करून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अखेरच्या काही षटकात हर्षल पटेल, दीपक चाहर आणि उमेश यादवनं फटकेबाजी केली. मात्र, तो पर्यंत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं झुकला होता. भारतीय संघ 18.3 षटकात ऑलआऊट झाला. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियस सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, वेन पारनेल, लुंगी एनगिडी आणि केशव महाराजच्या खात्यात प्रत्येकी दोन-दोन विकेट्स पडल्या. कागिसो रबाडानंही एक विकेट्स घेतली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाचव्या षटकात 30 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर क्विंटन डी कॉक आणि रिले रुसो यांच्यात अत्यंत महत्त्वाची 90 धावांची भागीदारी झाली. डी कॉकनं 43 चेंडूत 68 धावांची खेळी केली. ज्यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. परंतु, 12 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर डी कॉक रनआऊट झाला. डीकॉकनं आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. या खेळीदरम्यान डी कॉकनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 2000 धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज ठरला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खातंही उघडू न शकलेल्या रोसोनं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.अवघ्या 48 चेंडूत त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतकं झळकावलं.ज्यात 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget