(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA 3rd T20: रिले रोसो, क्विंटन डी कॉकसमोर भारतीय गोलंदाजांचं लोटांगण; विजयासाठी 228 धावांची गरज
IND vs SA 3rd T20: सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि रिले रोसो (Rilee Rossouw) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतासमोर 228 धावांचं लक्ष्य ठेवलंय.
IND vs SA 3rd T20: सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि रिले रोसो (Rilee Rossouw) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतासमोर 228 धावांचं लक्ष्य ठेवलंय. इंदोरच्या (Indore) होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 20 षटकात तीन विकेट्स गमावून 20 षटकात 227 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंडन डी कॉकनं 68 धावांचं योगदान दिलं. तर, रिले रोसोनं नाबाद 100 धावांची खेळी करत भारतासमोर विशाल लक्ष्य ठेवलंय.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पाचव्या षटकात 30 धावांवर असताना पहिली विकेट गमावली. यानंतर क्विंटन डी कॉक आणि रिले रुसो यांच्यात अत्यंत महत्त्वाची 90 धावांची भागीदारी झाली. डी कॉकनं 43 चेंडूत 68 धावांची खेळी केली. ज्यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. परंतु, 12 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर डी कॉक रनआऊट झाला. डीकॉकनं आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. या खेळीदरम्यान डी कॉकनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 2000 धावांचा टप्पा गाठलाय. अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज ठरला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खातंही उघडू न शकलेल्या रोसोनं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.अवघ्या 48 चेंडूत त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतकं झळकावलं.ज्यात 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे.
संघ-
भारताची प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
हे देखील वाचा-