एक्स्प्लोर

Vishal Nikam : ‘बिग बॉस मराठी’ विजेता विशाल निकम प्रेमापासून दुरावला? अभिनेत्याचा सौंदर्याशी ब्रेकअप!

Vishal Nikam Break up : चाहत्यांना, विशाल निकमची सौंदर्या कोण? याची उत्सुकता लागली होती. मात्र, आता सौंदर्याच्या रहस्यावरून पडदा उघडणारच नाहीये.

Vishal Nikam Break up : ‘मराठी बिग बॉस’ (Bigg Boss Marathi 3) फेम अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात असताना विशालची ‘सौंदर्या’ नेमकी कोण?, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना लागली होती. मात्र, आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेता विशाल निकम याचा ब्रेकअप झाला आहे. नुकताच त्याने याचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत त्याने आपलं नातं तुटल्याचे म्हटले आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात विशाल निकम याने सौंदर्यावरील प्रेमाची कबुली दिली होती. मात्र, याच घरात त्याची अभिनेत्री सोनाली पाटील हिच्याशी असलेली जवळीक पाहता, अनेकांना तीच सौंदर्या असल्याचे वाटले होते. मात्र, यानंतर त्याने पोस्ट लिहित सौंदर्या एक सामान्य मुलगी असून, तिचा मनोरंजन विश्वाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. तेव्हापासून चाहत्यांना सौंदर्या कोण? याची उत्सुकता लागली होती. मात्र, आता सौंदर्याच्या रहस्यावरून पडदा उघडणारच नाहीये.

आमचं नातं खरं होतं!

नुकतीच विशाल निकम याने ETimes TVला एक मुलाखत दिली. यात विशाल म्हणाला, ‘बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यानंतर आमचं नातं पाहिल्यासारखं नव्हतं, त्यामुळे आमचं ब्रेकअप झालं. आता ब्रेकअप म्हटल्यावर अनेकांना वाटेल की, मी सौंदर्याबद्दल खोटं बोलत होतो. पण, तसं नाही. आमचं नातं खरं होतं. सौंदर्या माझ्या आयुष्यात होती. पण आता ती नाहीये आणि मी आता सिंगल आहे.’ तर, आता मला केवळ माझ्या कामावर फोकस करायचा आहे, असेही तो म्हणाला.

सौंदर्या सामान्य मुलगी!

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सौंदर्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यावेळी विशाल निकमने पोस्ट लिहित म्हटले होते की, 'मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, योग्य वेळ आल्यावर आणि काही खाजगी गोष्टी सुरळीत झाल्यावर मी स्वत:हून सौंदर्याचं नाव सांगेल. ती एक समान्य मुलगी असून, अभिनय क्षेत्रासोबत तिचा काही एक संबंध नाही, त्यामुळे इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीसोबत माझं नाव कृपया जोडू नका. कारण यामुळे विनाकारण त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. प्लीज धीर धरा. मला वेळ द्या.'

विशाल हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिथुन या चित्रपटामध्ये विशालने महत्वाची भूमिका साकारली. 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेतील विशालच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेमुळे विशालला लोकप्रियता मिळाली. तसेच, 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेमध्ये देखील विशालने महत्त्वाची भूमिका साकारली.   

हेही वाचा :

Khatija Rahman : खतीजा रहमानचा निकाह संपन्न! ए.आर.रहमानने लेकीला शुभेच्छा देत शेअर केली खास पोस्ट..

Doctor Strange Twitter Review :  ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ प्रेक्षकांच्या भेटीला, नेटकऱ्यांना कसा वाटला चित्रपट? जाणून घ्या...

KGF 2 Breaks Record: ‘केजीएफ 2’ची बॉक्स ऑफिसवर हवा! ‘RRR’ला मागे टाकत ‘रॉकी भाई’चा नवा रेकॉर्ड!

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Huma Kureshi On Bold Scene: आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget