Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
Jio Platforms IPO: जिो प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार आहे. या आयपीओचं मूल्याकंन 10.3 लाख कोटी झालं आहे.

मुंबई : जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा आयपीओ भारतीय शेअर बाजारात उद्या लिस्ट होणार आहे. आयपीओचं अंदाजित मूल्यांकन 10.3 लाख कोटी रुपये आहे. या लिस्टिंगनंतर जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड शेअर बाजारातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली दूरसंचार आणि डिजीटेल सेवांमधील कंपनी ठरेल.
जिओ कंपनीनं या आयपीओच्या माध्यमातून 27 कोटी नवे शेअर 1119 रुपयांच्या किंमतपट्ट्यानुसार जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. 10.3 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यामुळं भारतीय शेअर बाजारातील सर्वाधिक बाजारमूल्य असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड चौथी कंपनी ठरेल. रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँक यानंतर जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा क्रम लागतो. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 16.2 लाख कोटी, भारती एअरटेल 12.2 लाख कोटी आणि एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 10.6 लाख कोटी आहे. तर, जिओचं बाजारमूल्य 10.3 लाख कोटी असेल.
आयपीओच्या माध्यमातून 10 लाख कोटींचं बाजारमूल्य पार करणारी जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड ही पहिली कंपनी ठरेल.
जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा आयपीओ नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार आहे.
आयपीओ 20 टक्के प्रीमिअमनं लिस्ट झाल्यास जिओ दुसऱ्या स्थानी
जिओच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तुफान बोली लावल्याचं पाहायला मिळालं होतं. ग्रे मार्केट प्रीमिअमनं आयपीओ 20 टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्ट होण्याची शक्यता आहे. त्यानुसार जिओचा आयपीओ 1340 रुपयांना लिस्ट होऊ शकतो. 20 टक्के प्रीमिअमसह आयपीओ लिस्ट झाल्यास जिओचं बाजारमूल्य 12.3 लाख कोटी रुपये होईल आणि जिओ मार्केटकॅपनुसार शेअर बाजारातील सर्वात दुसरी मोठी कंपनी ठरेल.
आयपीओच्या मूल्यांकनानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्स या दोन्हीचं मार्केट कॅप 27 लाख कोटी होईल. यामुळं रिलायन्स इंडस्ट्रीज मुकेश अंबानी भारतातील इतर अब्जाधीशांना मागं टाकतील.
27 ऑक्टोबरला टाटा ग्रुपच्या 32 कंपन्यांचं बाजारमूल्य 25.7 लाखकोटी आहे. तर गौतम अदानी यांच्या 11 कंपन्यांचं बाजारमूल्य 16.6 लाख कोटी आहे.
जिओचा आयपीओ 1340 रुपये प्रति शेअरनं लिस्ट झाल्यास रिलायन्स आणि जिओचं एकत्रित मार्केट 30 लाख कोटींपेक्षा अधिक होईल. जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होईल.
महत्त्वाच्या बातम्या






















