एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

खोटारडे कुठले, वन नेशन वन इलेक्शनची वल्गना करताय, अन् चार राज्यात निवडणुका घेत नाही; संजय राऊतांचा पीएम मोदींना टोला

Sanjay Raut on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात वन नेशन वन इलेक्शनवर भाष्य केले होते.

Sanjay Raut on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात वन नेशन वन इलेक्शनवर (One Nation One Election) भाष्य केले होते. त्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. 2019 साली हरियाणा आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका पार पडल्या होत्या. यंदा मात्र दोन्ही राज्यात वेगवेगळ्या निवडणुका पार पडणार आहे. महाराष्ट्रात दिवाळीआधी राज्यात निवडणुका पार पडतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता दिवाळीनंतर महाराष्ट्रातील निवडणुका पार पडतील, असे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगानेच दिले आहेत, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.  

संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात की, वन नेशन वन इलेक्शन. ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र या राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलेक्शनच्या वल्गना करत आहेत. खोटारडे कुठले, लोकांना मूर्ख बनवताय. महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये तुम्हाला हरण्याची भीती आहे. 

चार राज्यांची एकत्र निवडणूक घेण्याची फडणवीसांनी मागणी करावी 

त्यामुळे तुम्ही या दोन राज्यातल्या निवडणुका घ्यायला तयार नाहीत. तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा अजून एक हप्ता महिलांना लाच म्हणून द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही निवडणूक घेत नाही. तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणत आहात मग सुरुवात करा. या चार राज्यांची एकत्र निवडणूक घ्या, देवेंद्र फडणवीस यांनी मागणी करावी. मोदी लाल किल्ल्यावरून खोटे बोलतात, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

फडणवीसांनी महाराष्ट्राचे महाभारत समजून घ्यावे

महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सर्व कल्याणकारी योजना बंद करणार असून हे सावत्र भाऊ असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. यावरून संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने शेवटच्या काळात पुण्यात पेशव्यांचे राज्य सुरु होते त्याच पद्धतीने फडणवीस आणि त्यांचे लोक काम करत आहेत. हे तिघेही लोक घाशीराम कोतवाल आहेत. या तीनही घाशीराम कोतवालांच्या हातात महाराष्ट्र आहे. घाशीराम कोतवालांचा इतिहास काय हे आम्ही महाराष्ट्राला लवकरच सांगणार आहोत. लुटमार, खोटारडेपणा अराजक असा पेशव्यांचा आणि घाशीराम कोतवालांचा इतिहास होता. या महाराष्ट्राला आतापर्यंत शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले. 70 वर्षापेक्षा जास्त काळात या महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. फडणवीस यांना राजकीय इतिहास माहीत नसेल त्यांनी या महाराष्ट्राचे महाभारत समजून घ्यावे. 

देवेंद्र फडणवीसांकडून सुडाचे राजकारण

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत आहेत. त्यांचे राज्य जाईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. ते हरत आहोत म्हणून त्यांना भीती वाटते. त्यामुळे ते लोकांना धमक्या देत आहेत. बाकी दोघांना विषयी बोलण्यात काहीच अर्थ नाही. देवेंद्र फडणवीस पडद्यामागून जे कपटकारस्थान करत आहे ते महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. चांगल्या योजना कधीही बंद केला जात नाही. या प्रकारची मानसिकता कोणत्याही सरकारचे नसते. नरेंद्र मोदी यांनी देखील काँग्रेसच्या योजनांची नावे बदलून त्या चालवल्या आहेत. नरेंद्र मोदींनी नवीन काहीही केलेले नाही. त्यांचे सरकार जाणार असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच आमचे सरकार आल्यास आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे तीन हजार रुपये करू, असेही संजय राऊत यांनी म्हटले. 

महाराष्ट्र तुम्हाला पुन्हा सत्ता देईल का? 

देवेंद्र फडणवीस यांनी आता आपला गाशा गुंडाळायला सुरुवात करावी. महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही. या प्रकारचे दळभद्री घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केले आहे. आता त्याचा अंत जवळ आला आहे. महाराष्ट्राने मोदी आणि शाहांचे बहुमत गमावले आहे. महाराष्ट्र आता तुम्हाला पुन्हा सत्ता देईल का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

आणखी वाचा 

सरकारचं धाकधुक पाकपुक व्हायलंय; म्हणूनच दिल्लीतल्या पिताश्रीला सांगून निवडणूक पुढे ढकलली; अमोल कोल्हेंचे जहरी वार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Arrived Thane : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतलेTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 01 December 2024Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्यAmol Mitkari VS Gulabrao Patil : गुलाबरावारांनी जुलाबरावांसारखं होऊ नये, मिटकरींचा गुलाबरावांना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Embed widget