एक्स्प्लोर

मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा, शिवीगाळ, धमक्या देत थयथयाट, नेमकं घडलं काय?

तरुणाविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय .सौरभ भोले असे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे .

Chhatrapati Sambhajinagar: पावसाळी अधिवेशनातला राडा, नंतर  विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवरून लातूरमध्ये तुफान मारहाणीची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर  तरुणाने दारूच्या नशेत शिवीगाळ करत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे .यात संबंधित तरुणाने मंत्री शिरसाट यांची वाहने आणि सुरक्षा यंत्रणेलाही लक्ष्य केल्याची माहिती समोर आली असून तरुणाविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय .सौरभ घुले असे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे .

नेमका प्रकार काय ?

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी रात्री ( 20 जुलै) उशिरा एका तरुणाने दारूच्या नशेत गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे .मंत्री निवास परिसरात गोंधळ घालत त्याने सुरक्षारक्षकांना शिवीगाळ व धमक्याही दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार तरुण प्रचंड नशेत असताना मंत्री शिरसाठ यांना भेटायचे आहे असे म्हणत थयथयाट करत होता .त्याने मंत्री निवासाच्या परिसरात गोंधळ घालत गाड्यांच्या मागे धाव घेतली .सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करत धमक्याही दिल्याचा प्रकार उघड झालाय . दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांना बोलवण्यात आले .सातारा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने मंत्री शिरसाठ यांच्या बंगल्याबाहेर धाव घेत संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं .त्याच्यावर गुन्हाही दाखल केला . दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग केल्याचा व शासकीय व्यक्तींच्या सुरक्षेला बाधा निर्माण केल्याचा ठपका आरोपी तरुणावर ठेवण्यात आलाय . दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर पहारा वाढवला आहे .आता परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचा अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत .

कोणत्या व्हिडीओमुळे वाद सुरु झाला? (Manikrao Kokate Rummy Video)

नुकतंच पार पडलेलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आमदार आणि मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे चांगलच गाजलं. अधिवेशन संपलं पण नेतेमंडळींचे कारनामे काही संपत नाहीय. आमदार संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, भाजपचे  पडळकर यांच्यानंतर कृषिमंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात चक्क ऑनलाईन जुगार खेळतायत असा दावा करत आमदार रोहित पवारांनी हा व्हिडीओ ट्विट केला आणि त्यानंतर राज्यातल्या राजकारणात एक नवा वाद सुरु झाला. एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना कृषीमंत्र्यांचा हा खेळ पाहून नेमकं काय म्हणावं?, असा सवाल उपस्थित केला जातोय.

हेही वाचा

Suraj Chavan vs Chava Sanghatana: रमीपासून सुरुवात, लाथा-बुक्क्यांनी शेवट; सूरज चव्हाणांचा राडा, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?, वाचा पॉईंट टू पॉईंट

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Diwali : दिवाळी निमित्त मुस्लिम समाजासोबत फराळाचे आयोजन, खासदार शाहू महाराज उपस्थित
Yashomati Thakur : यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडेंनी साजरी केली भाऊबीज
Chitra Wagh, Prasad Lad Bhaubeej : चित्रा वाघ यांची भाऊबीज, म्हणाल्या 'नातं रक्ताच्या पलीकडचं'
Shaniwar Wada Row: 'निवडणुका आल्या की दंगली पेटवतात', Thackeray गटाचा BJP वर थेट हल्ला
Mahayuti Politics: 'आम्ही एकला चलो रे', भरत गोगावलेंचा Sunil Tatkare यांना नाव न घेता इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली!
राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली!
Bihar Election 2025: बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया
बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया
Video: गळ्यात झंडूच्या फुलाचा हार, डोळ्यावर गाॅगल अन् चक्क बिकिनी घालून परदेशी महिलेची गंगेत डुबकी; ऋषिकेशमधील व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ
Video: गळ्यात झंडूच्या फुलाचा हार, डोळ्यावर गाॅगल अन् चक्क बिकिनी घालून परदेशी महिलेची गंगेत डुबकी; ऋषिकेशमधील व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ
Thackeray bhaubeej: ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात कितव्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी
ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात कितव्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी
Embed widget