इराणमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त, 170 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती
इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान क्रॅश झाल्याची माहिती इराणच्या वृत्तसंस्थांकडून मिळत आहे.
तेहरान : इराणची राजधानी तेहरानमध्ये प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. युक्रेनचे बोईंग 737 हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या विमानात 180 प्रवासी प्रवास करत होते. तेहरानच्या इमाम खुमैनी विमानतळाजवळ हा अपघात झाला. विमानातील 170 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
Iranian state TV reports Ukrainian airplane carrying 180 passengers and crew has crashed near airport in capital, Tehran: AP pic.twitter.com/yipppmpRHD
— ANI (@ANI) January 8, 2020
तांत्रिक बिघाडामुळे विमान क्रॅश झाल्याची माहिती इराणच्या वृत्तसंस्थांकडून मिळत आहे. उड्डाण भरल्यानंतर काही वेळातच विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजता ही दुर्घटना घडली आहे. या विमानाने तेहरानहून युक्रेनची राजधानी किएफच्या दिशेने उड्डाण भरलं होतं. मात्र 7900 फूट उंचीवर विमान क्रॅश झालं.
#Breaking First footage of the Ukrainian airplane while on fire falling near #Tehran pic.twitter.com/kGxnBb7f1q
— Ali Hashem علي هاشم (@alihashem_tv) January 8, 2020