परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्वीट करुन भारतीय संस्कृतीचा दाखला देत, आलियासाठी चिंतीत असल्याचं म्हटलं होतं. तसेच सर्वांच्याच मुली असतात असेही त्या आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या होत्या.
2/12
तसेच आपल्या दुसऱ्या ट्विटमधून सुषमा स्वराज यांच्या भेटी बद्दल माहिती दिली. ती म्हणाली की, माझी सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी मायदेशी परतण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे.
3/12
मात्र, पीओकेवरील सर्जिकल स्ट्राईकमुळे त्यांच्या परतीच्या प्रवासाच्या तारखेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
4/12
याला उत्तर देताना आलियाने म्हटलं होतं की, आपल्याला सुषमा स्वराज यांनी मुलीचा दर्जा दिला हा मोठा आधार होता. तसेच तिने आपला गट सुखरुप मायदेशी परतला असल्याचंही ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
5/12
यानंतर तिने ट्वीट करुन सर्व भारतीय पाहुण्यांना ईश्वराचा दर्जा देतात असे म्हटलं.
6/12
दरम्यान 1 ऑक्टोबर रोजी आगाज-ए-दोस्तीच्या अलिया हरिरने सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली. यावेळी स्वराज यांनी त्यांना स्वगृही पाठवण्याचे आश्वासन दिले.
7/12
या संबंधित तरुणांच्या कुटुंबियांनी त्यांना मायदेशी परतण्याचा तगादा लावला होता.
8/12
या फेस्टीव्हलमध्ये पाकिस्तानातील 19 जणांच्या एका टीमने सहभाग घेतला होता. ते 4 ऑक्टोबर रोजी मायदेशी परतणार होते.
9/12
यानंतर भारतातील गर्ल्स फॉर पीस ग्रुपच्या पाकिस्तानी तरुणींना तत्काळ विशेष संरक्षण दिले होते.
10/12
पाकिस्तानी तरुणांच्या शिष्ठमंडळानेही सुषमा स्वराजांचे याबद्दल आभार मानले आहेत.
11/12
गेल्या 27 सप्टेंबर रोजी चंदीगढमध्ये झालेल्या ग्लोबल यूथ पीस फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते.
12/12
उरीमधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने पीओकेवर केलेले यशस्वी सर्जिकल स्ट्राईक यामुळे भारत-पाक संबंध कमालीचे ताणले आहेत. मात्र, भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे एका कार्यक्रमानिमित्त भारतात आलेले पाकिस्तानी तरुण आपल्या मायदेशी परतले आहेत.