(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dronacharya Award : सुमा शिरुर आणि दिनेश लाड यांना केंद्र शासनाचा यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर
पनवेलची राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरुर आणि मुंबईतील क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना केंद्र शासनाचा यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ३० नोव्हेंबरला केंद्र शासनाच्या क्रीडा पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. सुमा शिरूरनं गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय प्रशिक्षक कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. तिनं घडवलेल्या नेमबाजांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळवून दिलंय. याच कामगिरीसाठी सुमाला द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूरसारख्या गुणवान क्रिकेटवीरांना घडवणारे प्रशिक्षक म्हणून दिनेश लाड यांनाही द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या अविनाश साबळे, भक्ती कुलकर्णी, सागर ओव्हाळकर आणि स्वप्निल पाटील यांचा अर्जुन क्रीडा पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. टेबल टेनिसपटू अचांता शरथ कमालचा खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे.