Paris Neeraj Chopra Silver Medalभारताच्या नीरज चोप्राला भालाफेकीचं रौप्यपदक,नीरजशी Exclusive बातचित
Paris Neeraj Chopra Silver Medalभारताच्या नीरज चोप्राला भालाफेकीचं रौप्यपदक,नीरजशी Exclusive बातचित
पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नव्या ऑलिम्पिक विक्रमासह भालाफेकीचं सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. पण भारताच्या नीरज चोप्राला कारकीर्दीतली सर्वोत्तम कामगिरी बजावूनही रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर्सवर, तर नीरज चोप्रानं दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटर्सवर भालाफेक केली. हीच कामगिरी अर्शदला सुवर्ण आणि नीरजला रौप्यपदक मिळवून देणारी ठरली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता एक रौप्य आणि चार कांस्य अशी पाच पदकं जमा झाली आहेत. नीरज चोप्राचं हे दुसरं ऑलिम्पिक पदक ठरलं. त्यानं टोकियोत सुवर्णपदकाची कमाई केली होती. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात दोन पदकं पटकावणारा नीरज चोप्रा हा चौथा खेळाडू ठरला. याआधी पैलवान सुशीलकुमार,बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि नेमबाज मनू भाकर यांनी दोन पदकांची कमाई केली आहे.